Operation Sindoor नंतर इंडियन प्रीमिअर लीग २०२५ होणार की नाही, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्याचा फटका मुंबई इंडियन्सला बसणार असल्याचे संकेत मिळत आहे, कारण त्या आशयाचं एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मंगळवारी मुंबई इंडियन्सला वानखेडे स्टेडियमवर गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करावा लागला. अटीतटीच्या लढतीत गुजरातने शेवटच्या चेंडूवर रोमहर्षक विजयाची नोंद केली. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे प्ले ऑफचे गणित बिघडले आहे आणि त्यात या पत्राने MI चं टेंशन वाढवलं आहे.