

Pat Cummins
esakal
Pat Cummins Praises SRH Batters And Bowlers: इंडियन प्रीमियर लीग(IPL) २०२६ च्या ६७ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने उत्कृष्ट खेळ दाखवत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ५५ धावांनी पराभूत केले. हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) सामन्यानंतर आपल्या संघाच्या कामगिरीवर खूप खुश होता. सनरायझर्स हैदराबादच्या (SHR) कर्णधाराने आपल्या संघाच्या फलंदाजांचे सामन्यानंतर भरभरून कौतुक केले. पॅट कमिन्स म्हणाला की आम्ही आरसीबीला हरवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरलो नव्हतो.