
रविवारी (१ जून) मध्यरात्री पंजाब किंग्स संघाने इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेच्या क्वालिफायर २ सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध ५ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह पंजाब किंग्सने आयपीएल २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे.
पंजाब किंग्सने २०१४ नंतर म्हणजेच तब्बल ११ वर्षांनंतर आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. पंजाबच्या या विजयात कर्णधार श्रेयस अय्यरने नाबाद अर्धशतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला.