
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील अंतिम दोन संघ अखेर निश्चित झाले आहेत. रविवारी (१ जून) पंजाब किंग्सने पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सला क्वालिफायर २ सामन्यात पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे पंजाब किंग्स आयपीएल २०२५ मध्ये अंतिम सामन्यात पोहणारा दुसरा संघ ठरला आहे.