
प्रियांश आर्याच्या दमदार शतक अन् शशांक सिंग व मार्को यान्सेन यांच्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवला. पंजाबच्या ६ बाद २१९ धावांचा पाठलाग करताना चेन्नईला ५ बाद २०१ धावांपर्यंतच पोहोचता आले. महेंद्रसिंग धोनीने १२ चेंडूंत २७ धावांची खेळी करून CSK च्या विजयासाठी जोर लावला, परंतु १८ धावा कमी पडल्या. शतकवीर प्रियांशला मॅन ऑफ दी मॅच पुरस्काराने गौरविण्यात आले. पण, त्याचवेळी PBKS च्या स्टार खेळाडूला दंड भरावा लागला.