Punjab Kings vs Chennai Super Kings Marathi Update : चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांना आज २४ वर्षीय फलंदाजाने हैराण केले. प्रियांश आर्या जो दिल्लीच्या स्थानिक स्पर्धांमध्ये मैदान गाजवून प्रसिद्धीत आला, त्याने पंजाब किंग्सकडून खेळताना इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये शतकी खेळी केली. पंजाब किंग्सने ३.८ कोटींमध्ये त्याला आपल्या ताफ्यात दाखल केले होते. प्रियांशने दिल्लीतील ट्वेंटी-२० स्पर्धेत सहा चेंडूंत सहा षटकार खेचण्याचा पराक्रम केला होता.