PBKS vs GT IPL 2024 : गतविजेत्या गुजरातसाठी प्लेऑफची वाट बिकट... पंजाबचे शशांक सिंग-आशुतोष शर्मावर पुन्हा एकदा सर्वाच्या नजरा

गतविजेते गुजरात आणि पंजाब किंग्ज यांच्यात आज सामना होत आहे. दोघांनाही त्यांच्या गेल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यामुळे आजच्या सामन्यात विजय पुढच्या प्रवासाठी मोलाचा ठरणार आहे; परंतु जो संघ पराभूत होईल त्यांची वाट बिकट होऊ शकेल.
Punjab Kings vs Gujarat Titans IPL 2024 Match News Marathi
Punjab Kings vs Gujarat Titans IPL 2024 Match News Marathisakal

Punjab Kings vs Gujarat Titans IPL 2024 : गतविजेते गुजरात आणि पंजाब किंग्ज यांच्यात आज सामना होत आहे. दोघांनाही त्यांच्या गेल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यामुळे आजच्या सामन्यात विजय पुढच्या प्रवासाठी मोलाचा ठरणार आहे; परंतु जो संघ पराभूत होईल त्यांची वाट बिकट होऊ शकेल. कारण या क्षणी दोन्ही संघ अनुक्रमे आठव्या आणि नवव्या स्थानावर आहेत.

Punjab Kings vs Gujarat Titans IPL 2024 Match News Marathi
Dinesh Karthik T20 World Cup : दिनेश कार्तिक टी-20 वर्ल्ड कप खेळणार? IPL दरम्यान केलं मोठं वक्तव्य

पंजाब संघाला मुंबईविरुद्ध निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला होता; परंतु शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा यांनी केलेली अफलातून फलंदाजी पंजाबसाठी त्यांचे दैव बदलणारी ठरू शकेल. हे दोन्ही फलंदाज यंदाच्या आयपीएलमधील वेगळे आकर्षण ठरत आहे.

विशेषकरून आशुतोष शर्मावर निवड समितीचेही लक्ष आहे. आता हे दोन्ही फलंदाज सातत्य कसे राखतात हे महत्त्वाचे आहे. आजच्या सामन्याचा निकाल काहीही लागला तरी शशांक आणि आशुतोष कशी फलंदाजी करतात आणि किती धावा करतात याकडे सर्वांचे लक्ष असेल.

Punjab Kings vs Gujarat Titans IPL 2024 Match News Marathi
IPL 2024 : 2011 मध्येच नारायणबाबत हा अंदाज लावला...; गंभीरने कॅरेबियन स्टारबद्दल केलं अनेक खुलासे

जसप्रीत बुमराला स्वीपचा षटकार मारण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या आशुतोषचा आत्मविश्वास कमालीचा उंचावलेला असणार. गुजरात संघाकडे राशिद खानचा अपवाद वगळता इतर कोणीही विख्यात गोलंदाज नाही. त्यामुळे शुभमन गिलला असलेल्या गोलंदाजांसह रणनीती तयार करावी लागेल. मोहित शर्मा हळूवार चेंडू टाकण्यात वाकबगार आहे. त्यामुळे तोसुद्धा गुजरातसाठी आशास्थान असेल.

एकीकडे शशांक आणि आशुतोष फॉर्मात असताना पंजाबचे इतर फलंदाज मात्र निराशा करत आहेत. त्याचाच फटका त्यांना मुंबईविरुद्धच्या सामन्यात बसला होता. शिखर धवन खांदा दुखापतीमुळे खेळू शकत नाही, त्याची उणीव पंजाबला निश्चितच जाणवत आहे.

Punjab Kings vs Gujarat Titans IPL 2024 Match News Marathi
IPL 2024 Points Table : हैदराबादने एका दगडात मारले 3 पक्षी; दिल्लीसह CSK अन् 'या' संघाला बसला मोठा धक्का!

गुजरात संघाचा दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात ८९ धावांत धुव्वा उडाला होता. आता तीन दिवसांनंतर त्यांना पंजाबाविरुद्धच्या आव्हानासाठी सज्ज व्हायचे आहे. प्रथम त्यांना मानसिकता सक्षम करावी लागणार आहे. मुळात दिल्लीविरुद्ध झालेल्या मोठ्या पराभवाचा फटका त्यांच्या निव्वळ सरासरीलाही बसलेला आहे; परंतु आता सरासरी किती आहे याचा विचार करण्यापेक्षा विजय हेच ध्येय त्यांना ठेवावे लागणार आहे.

सर्वप्रथम संघाच्या फलंदाजीची धुरा कर्णधार शुभमन गिल याला सांभाळावी लागणार आहे. शुभमनला किमान १५ षटके तरी फलंदाजीचे ध्येय ठेवावे लागणार आहे. साई सुदर्शन यंदाच्या मोसमात बऱ्यापैकी धावा करत आहे. मात्र गुजरातची मधली फळी फारच कमकुवत वाटत आहे.

दोन्ही संघांची ताकद, फलंदाजांचा फॉर्म पाहता गुजरातसाठी विजय सोपा नसेल. पंजाबसाठी मात्र आशादायी चित्र आहे. दोघांचे प्रत्येकी सात सामने झाले आहेत. मात्र गुजरातने मिळवलेला एक अधिक विजय त्यांना गुणतक्त्यात पंजाबच्या पुढे ठेवणारा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com