
सोमवारी (२५ मे) इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत मुंबई इंडियन्सला पंजाब किंग्सने ७ विकेट्सने पराभूत केले. हा दोन्ही संघांचा प्लेऑफपू्र्वीचा अखेरचा साखळी सामना होता. या सामन्यातील विजयासह पंजाब किंग्सने १४ सामन्यांनंतर १९ गुणांसह पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल क्रमांक मिळवला आहे.
यासह त्यांनी क्वालिफायर १ सामन्यात प्रवेश मिळवला आहे. तसेच मुंबई इंडियन्स मात्र चौथ्या क्रमांकावर राहिले आहेत. त्यामुळे आता मुंबईला एलिमिनेटर सामना खेळावा लागणार हे निश्चित आहे.