

India Vs Afghanistan
esakal
Afghanistan Tour: भारतीय संघ पुढील महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध एक कसोटी आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. ही मालिका भारतात खेळली जाणार आहे. या मालिकेत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. भारतीय निवड समिती बुमराहचा वाढलेला कामाचा ताण लक्षात घेता त्याला अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी संधी देणार नसल्याचं सांगितलं जात आहे.