DC चा सलामीवीर पृथ्वी शॉ रुग्ण शय्येवर; हृदयस्पर्शी फोटो केला शेअर | Prithvi Shaw News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

prithvi shaw hospitalised

DC चा सलामीवीर पृथ्वी शॉ रुग्ण शय्येवर; हृदयस्पर्शी फोटो केला शेअर

Prithvi Shaw IPL 2022: आयपीएलमध्ये 55 वा सामना दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात खेळला गेला. सीएसकेने दिल्ली कॅपिटल्सवर 91 धावांनी विजय मिळवला. प्लेऑफच्या दृष्टिकोनातून हा सामना जिंकणे दिल्लीसाठी अत्यंत महत्त्वाचा होता. मात्र या सामन्यापूर्वीच दिल्लीला मोठा धक्का बसला होता. DC चा सलामीवीर पृथ्वी शॉ सामन्यातून बाहेर पडल्यानंतर रुग्णालयात पोहोचला आहे. त्यानंतर त्यांनी एक हृदयस्पर्शी फोटो शेअर केला.(Prithvi Shaw Hospitalised)

हेही वाचा: CSK प्लेऑफमध्ये न पोहोचण्याच्या चर्चांदरम्यान धोनीचं मोठं विधान; म्हणाला...

आयपीएलचा IPL 2022 हा हंगाम पृथ्वी शॉसाठी खूप चांगला चालू आहे. त्याने 9 सामन्यात 160 च्या स्ट्राईक रेटने 259 धावा केल्या आहेत. या हंगामात त्याने दोन अर्धशतकेही केली आहेत. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामनातही प्रकृती अस्वास्थ्यामुळे पृथ्वी शॉ मुकला होता आणि काल चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यातूनही तो बाहेर होता.

हेही वाचा: कोलकतासमोर मुंबईचे आव्हान; नवी मुंबईत आज रंगणार लढत

चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा नेट बॉलर कोरोना पॉझिटिव्ह (Net Bowler Testing Covid Positive) आला होता. बीसीसीआयने आयपीएल 2022 साठी बनवलेल्या कोरोना प्रोटोकॉलनुसार, दिल्ली कॅपिटल्सला कोरोना चाचणीच्या दुसर्‍या फेरीतून जावे लागेल आणि तोपर्यंत सर्व खेळाडू खोल्यांमध्ये एकटे-एकटे राहतील. एप्रिलच्या सुरुवातीला दिल्ली कॅपिटल्सचा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिचेल मार्शची कोविड-19 साठी दुसरी RT-PCR चाचणी पॉझिटिव्ह आली होती, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Web Title: Prithvi Shaw Hospitalised Due To A Fever Delhi Capitals Ipl 2022 Dc Vs Csk

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top