MITCHELL OWEN REPLACES GLENN MAXWELL IN PUNJAB KING
पाकिस्तान सुपर लीग २०२५ ला लाथ मारून आणखी एक फलंदाज इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये दाखल झाला आहे. पंजाब किंग्सने ग्लेन मॅक्सवेलच्या जागी या खेळाडूला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा आणखी जळफळात होणे स्वाभावीक आहे. यापूर्वी कॉर्बिन बॉशने मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी PSL मधून माघार घेतली होती. मॅक्सवेलच्या जागी आयपीएल २०२५ मध्ये दाखल होणारा खेळाडू पीएसएलमध्ये पेशावर झाल्मी संघाकडून खेळला होता, शुक्रवारी त्याने या संघाकडून अर्धशतकही झळकावले होते. पण, आता आयपीएलकडून डील मिळाल्यावर तो नकार देऊ शकला नाही.