Shikhar Dhawan : IPL दरम्यान शिखर धवनला काय झालं? मोठी अपडेट आली समोर

दुखापतीमुळे धवन सामन्यांना मुकणार! पंजाब संघाचे प्रमुख संजय बांगर यांच्याकडून माहिती
Shikhar Dhawan
Punjab Kings Shikhar Dhawan sakal

राजस्थान रॉयल्सकडून पराभूत झाल्यानंतर पंजाब किंग्स संघाचे क्रिकेट सुधारणा प्रमुख संजय बांगर यांनी कर्णधार शिखर धवनच्या दुखापतीबाबत माहिती देताना सांगितले की, धवनच्या खांद्याला दुखापत झाली असून तो सात ते दहा दिवस खेळू शकणार नाही. त्यामुळे आयपीएलमधील सामन्यांना तो मुकणार आहे.

Shikhar Dhawan
IPL 2024 Points Table : चेन्नईविरुद्ध पराभवानंतर पांड्याला बसला मोठा धक्का! पॉइंट टेबलमध्ये गेली खाली...

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या शनिवारी झालेल्या लढतीत पंजाब संघाचे नेतृत्व सॅम करन याने केले. शिखर धवन दुखापतीमुळे खेळू शकला नाही. या लढतीत राजस्थानने पंजाबवर तीन विकेट राखून मात केली. संजय बांगर याप्रसंगी म्हणाले, धवनच्या खांद्याला दुखापत झाली.

तो अनुभवी खेळाडू आहे. भारतातील खेळपट्ट्यांवर त्याच्यासारखा खेळाडू संघात असायलाच हवा. त्याची अनुपस्थिती संघासाठी क्लेशदायक ठरत आहे. त्याच्या खांद्यावर उपचार सुरू आहेत. दुखापतीमधून तो पूर्णपणे केव्हा बाहेर येतो हे पडताळले जात आहे. सध्या तरी तो सात ते दहा दिवस खेळू शकणार नाही.

Shikhar Dhawan
MI vs CSK IPL 2024 : 'स्टंपच्या मागे त्या व्यक्तीने...' मुंबईच्या पराभवानंतर धोनीबद्दल काय म्हणाला हार्दिक पांड्या?

प्रमुख फलंदाजी अपयशी

संजय बांगर यांनी पंजाबच्या फलंदाजीवर दृष्टिक्षेप टाकला. ते म्हणाले, शिखर धवनच्या अनुपस्थितीत अथर्व तायडेला सलामीला पाठवण्यात आले; पण त्यालाही अपयश आले. जॉनी बेअरस्टोचा सुमार फॉर्म कायम राहिला. प्रमुख फलंदाज मेहनत करीत नाहीत असे मी म्हणणार नाही; पण त्यांना यश मिळत नाही, एवढं मात्र नक्की आहे.

खेळपट्टीवर फलंदाजांचा कस

मुल्लानपूर येथील लढतीत फलंदाजांचा कस लागत आहे. सुरुवातीच्या सहा षटकांमध्ये फलंदाजांसमोर आव्हान उभे राहत आहे. येथील खेळपट्टीवर चेंडू खालीवर राहत आहे. त्यामुळे फलंदाजांना धावा करण्यास मोकळीक मिळत नाही. पंजाबच्याच फलंदाजांचा नव्हे तर प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांनाही आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे, असे संजय बांगर पुढे स्पष्ट करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com