
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत राजस्थान रॉयल्सची सुरुवात फारशी चांगली झालेली नाही. त्यांना रियान परागच्या नेतृत्वात खेळताना पहिल्या दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर अखेर तिसऱ्या सामन्यात त्यांनी चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत पहिल्या विजयाची नोंद केली.
दरम्यान, पहिल्या तीन सामन्यात रियान परागला राजस्थानचे नेतृत्व करावे लागण्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे संघाता नियमित कर्णधार संजू सॅमसन यष्टीरक्षण करण्यासाठी पूर्ण फिट नव्हता. त्यामुळे राजस्थानने त्याला या तीन सामन्यात फक्त फलंदाज म्हणून इम्पॅक्ट सब्स्टिट्युटच्या भूमिकेत खेळवले. पण आता राजस्थानसाठी आनंदाची बातमी आली आहे.