PBKS vs MI IPL 2024 : तिसऱ्या विजयासाठी मुंबई अन् पंजाब भिडणार; मुंबईची गोलंदाजी चमकणार?

PBKS vs MI IPL 2024
PBKS vs MI IPL 2024esakal

Punjab Kings Vs Mumbai Indians IPL 2024 33th Match : मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये उद्या आयपीएलमधील साखळी फेरीची लढत रंगणार आहे. याप्रसंगी दोन्ही संघ या लढतीत यंदाच्या मोसमातील आव्हान कायम राखण्यासाठीच मैदानात उतरणार आहेत.

उभय संघांनी सहा सामन्यांमधून फक्त दोन सामन्यांमध्ये विजय मिळवले असून चार सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. दोन्ही संघांच्या निव्वळ सरासरीमध्ये थोडासाच फरक आहे. याच कारणामुळे आता मुंबई - पंजाबमधील लढत रोमहर्षक ठरण्याची शक्यता आहे. मुल्लानपूर येथे गोलंदाजांना मदत करणारी खेळपट्टी असल्यामुळे फलंदाजांसमोर आव्हान असणार एवढे मात्र निश्‍चित आहे.

PBKS vs MI IPL 2024
GT vs DC : पॉवर प्लेमध्येच गुजरात हरली! दिल्लीच्या वेगवान माऱ्यासमोर घरच्या मैदानावरच टाकल्या नांग्या

पहिल्या तीन लढतींत पराभूत झाल्यानंतर दिल्ली व बंगळूरला नमवणाऱ्या मुंबईला मागील लढतीत चेन्नईकडून हार पत्करावी लागली. रोहित शर्माच्या देदीप्यमान शतकानंतरही मुंबईचा पाय खोलात गेला. या पराभवाला मागे टाकून मुंबईचा संघ उद्या पंजाबचा सामना करणार आहे.

कर्णधार हार्दिक पंड्याचा सुमार फॉर्म मुंबईसाठी चिंतेची बाब ठरत आहे. त्याला सहा सामन्यांमधून फक्त तीनच विकेट मिळवता आल्या असून या दरम्यान त्याच्या गोलंदाजीवर १२च्या सरासरीने धावांची लूट करण्यात आली आहे. उर्वरित लढतींमध्ये हार्दिककडून झोकात पुनरागमनाची आशा आहे.

मुंबईकडून रोहित शर्मा (२६१ धावा), इशान किशन (१८४ धावा), तिलक वर्मा (१७४ धावा) यांनी महत्त्वपूर्ण धावा उभारल्या आहेत. टीम डेव्हिड, रोमारिओ शेफर्ड व सूर्यकुमार यादव यांनीही निर्णायक क्षणी फलंदाजीत चमक दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र मुंबईच्या सर्व फलंदाजांना कामगिरीत सातत्य राखण्याची गरज आहे. मुंबईच्या या महिन्यातील लढती आता बाहेरच्या मैदानांवर आहेत. त्यामुळे सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे.

जसप्रीत बुमरा लढतोय

मुंबईचा गोलंदाजी विभाग जसप्रीत बुमराच्या खांद्यावर अवलंबून आहे. त्याने यंदाच्या मोसमात आतापर्यंत सहा सामन्यांमधून दहा फलंदाज बाद केले आहेत. एवढेच नव्हे तर फक्त ६.०८च्या सरासरीने त्याने धावा दिलेल्या आहेत.

मुंबईच्या इतर गोलंदाजांना मात्र ठसा उमटवता आलेला नाही. गेराल्ड कोएत्झी याने नऊ विकेट मिळवल्या आहेत, पण त्याच्या गोलंदाजीवर १०.२६च्या सरासरीने धावांची लूट करण्यात आली आहे. आकाश मधवाल, पीयूष चावला व रोमारिओ शेफर्ड यांनी स्तर उंचावण्याची गरज आहे.

PBKS vs MI IPL 2024
GT vs DC IPL 2024 : दिल्लीनं गुजरातचा विषय 9 षटकातच संपवला; होम ग्राऊंडवर गिलला पंतनं दिलं मात

भारतीयांवर अवलंबून

कर्णधार शिखर धवनला दुखापत झाल्यामुळे पंजाबचा संघ अडचणीत सापडला आहे. किमान आठवडाभर तरी तो संघात येऊ शकणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत भारतातील इतर फलंदाजांवर पंजाबची मदार असणार आहे.

शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, आशुतोष शर्मा या चार फलंदाजांना मुंबईच्या गोलंदाजांचे आव्हान परतवून लावावे लागणार आहे. सध्याच्या घडीला शशांक व आशुतोष यांनी दबावाखालीही छान कामगिरी केली आहे.

पण प्रभसिमरन व जितेश यांना अद्याप सूर गवसलेला नाही. त्यांच्याकडून अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत.

सॅम करन, कागिसो रबाडा सरस

पंजाबसाठी परदेशी खेळाडू सरस कामगिरी करताहेत. सॅम करन (१२६ धावा व ८ विकेट) व कागिसो रबाडा (९ विकेट) यांनी प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध धडाकेबाज खेळ केला. पण अर्शदीप सिंग (९ विकेट) व हर्षल पटेल (७ विकेट) या भारतीय गोलंदाजांवर प्रतिस्पर्धी फलंदाज आक्रमण करताना दिसत आहेत. मुंबईच्या फलंदाजांविरुद्ध या दोन्ही गोलंदाजांचा कस लागणार हे निश्‍चित आहे.

(IPL 2024 Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com