Sanju Samson Wants 'This' Rule To Change in IPL: इंडियन प्रीमियर लीग २०२५ सर्धा येत्या २२ मार्चपासून सुरू होणार आहे. त्यामुळे संघांची तयारी सुरू झाली असून खेळाडू आपापल्या संघात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. या हंगामात चक्क १३ वर्षांचा खेळाडूही खेळताना दिसण्याची शक्यता आहे.
१३ वर्षांच्या वैभव सुर्यवंशी याला राजस्थान रॉयल्सने लिलावात खरेदी केले आहे. याबद्दल नुकतेच राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने भाष्य केले आहे. याशिवाय एक नियम बदलण्याची इच्छा असल्याचेही त्याने सांगितले.