IPL 2025 Chennai Super Kings vs Rajasthan Royals: राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ चा शेवट गोड केला. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात त्यांनी दणदणीत विजयाची नोंद केली. यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी व संजू सॅमसन यांनी सुरुवातच दमदार सुरुवात करून देताना CSK ला बॅकफूटवर फेकले. राजस्थानने हा सामना सहज जिंकून स्पर्धाचा निरोप घेतला.