RR vs SRH : सुपर कॉम्पुटरने वर्तवला अंदाज; जाणून घ्या कोणाच्या हातात जाणार आयपीएलची ट्रॉफी

RR vs SRH Super Computer Prediction : राजस्थान रॉयल्स आणि सनराईजर्स हैदराबाद यांच्यात क्वालिफायर 2 चा सामना होणार आहे.
RR vs SRH Shreyas Iyer
RR vs SRH Super Computer Prediction esakal

RR vs SRH Super Computer Prediction : राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा पराभव केल्यानंतर आता आयपीएल 2024 च्या क्वालिफायर 2 सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सनराईजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हा सामना चेन्नईत होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ 26 मे रोजी चेन्नईतच कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध अंतिम सामना खेळणार आहे. या दोन्ही सामन्यांचे BETSiE Super Computer ने काही अंदाज वर्तवले आहेत.

RR vs SRH Shreyas Iyer
Ambati Rayudu RCB : सीएसके आरसीबीला त्यांची एक ट्रॉफी देऊ शकते जेणेकरून ते... रायुडू असं का म्हणाला?

कोण जिंकणार फायनल?

BETSiE Super Computer ने वर्तवलेल्या अंदाजानुसार केकेआरची सरशी होण्याची शक्यता आहे. प्ले ऑफ सुरू झाला त्यावेळी केकेआर फायनल जिंकण्याची शक्यता 38.10 टक्के होती. आता ती 53.80 टक्के झाली आहे. दुसरीकडे हैदराबाद आयपीएल जिंकण्याची शक्यता 21.90 टक्के इतकी आहे. तर राजस्थान रॉयल्स आयपीएल जिंकण्याची शक्यता 24.30 टक्के इतकी आहे.

सुपर कॉप्युटरने फक्त फायनल कोण जिंकणार याचाच अंदाज वर्तवलेला नसून क्वालिफायर 2 मध्ये कोणचाची सरशी होऊ शकते याचा देखील अंदाज वर्तवला आहे. सुपर कॉम्पुटरनुसार फायनल गाठण्याची संधी राजस्थानला हैदराबादपेक्षा जास्त आहे. राजस्थानला 51.20 टक्के इतकी आहे. तर हैदराबादला क्वालिफायर जिंकण्याची संधी 48.80 टक्के इतकी आहे.

RR vs SRH Shreyas Iyer
Hardik Pandya Natasa Stankovic : नेमकं असं काय झालंय... हार्दिक अन् नताशाचा होणार घटस्फोट?

सुपर कॉम्पुटरनुसार क्वालिफायर 2 सामन्यात राजस्थान जवळपास 190 धावा करून शकते. तर हैदराबादला 186 धावांपर्यंत मजल मारता येईल.

फायनलमध्ये किती धावा होणार?

फायनलमध्ये केकेआर आणि हैदराबाद असा सामना झाला तर केकेआर 212 धावांपर्यंत पोहचू शकते तर हैदराबाद 198 धावांपर्यंत पोहचू शकते. दुसरीकडे जर राजस्थान फायनलमध्ये आली तर केकेआर 189 धावा करू शकते तर राजस्थान 180 धावांपर्यंतच पोहचू शकते.

(IPL 2024 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com