GT vs LSG : राशिद खानसाठी आजचा सामना ठरू शकतो खास | Rashid Khan IPL T20 Mile Stone | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rashid Khan IPL T20 Mile Stone

GT vs LSG : राशिद खानसाठी आजचा सामना ठरू शकतो खास

पुणे : आयपीएलच्या 15 व्या हंगामाच्या (IPL 2022) गुणतालिकेत सध्या अव्वल दोन स्थानावर असलेल्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि लखनौ सुपर जायंट यांच्यात सामना होत आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होणाऱ्या या सामन्यात गुजरातचा फिरकीपटू राशिद खानला (Rashid Khan) टी 20 कारकिर्दितला एक मैलाचा दगड (T20 Mile Stone) पार करण्याची नामी संधी आहे. गुजरात टायन्सचा हा अव्वल लेग स्पिनर टी 20 कारकिर्दित 450 विकेट पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर आहे.

हेही वाचा: राहुल द्रविड भाजपच्या कार्यक्रमात उपस्थिती लावण्याबाबत म्हणतो...

राशिद खानने आयपीएलच्या 15 व्या हंगामात राशिद खानने आतापर्यंत 27.36 च्या सरासरीने 11 विकेट घेतल्या आहेत. राशिद खानला आपल्या टी 20 कारकिर्दितील 450 विकेटचा टप्पा पार करण्यासाठी फक्त 4 विकेट्सची गरज आहे. जर राशिद खानने 450 विकेट पूर्ण केल्यानंतर तो अशी कामगिरी करणारा ड्वेन ब्राव्हो आणि इमरान ताहिरनंतरचा फक्त तिसरा गोलंदाज असेल.

यंदाच्या हंगामात राशिदची गोलंदाजी किफायतशील ठरली आहे. त्याचा इकॉनॉमी रेट हा 6.40 इतका चांगला राहिला आहे. त्याने यंदाच्या हंगामात पंजाब किंग्ज विरूद्धच्या सामन्यात 22 धावा देत 3 विकेट घेतल्या होत्या. राशिदची टी 20 कारकिर्द पाहिली तर त्याने आतापर्यंत 322 टी 20 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 446 विकेट घेतल्या असून त्याचा इकॉनॉमी रेट हा 6.36 इतका आहे. त्याची 17 धावात 6 बळी ही टी 20 क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी आहे.

हेही वाचा: रोहित आउट होता की नव्हता? स्निकोमीटरमुळे सर्वांचे डोके भंजाळले

राशिद खानने यंदाच्या हंगामात आपल्या फलंदाजीने देखील प्रभावित केले आहे. तो आक्रमक फटकेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. सध्या तो टी 20 मध्ये 100 षटकार मारण्याच्या जवळ पोहचला आहे. त्याला टी 20 मधील 100 षटकार पूर्ण करण्यासाठी फक्त 2 षटकार मारण्याची गरज आहे. यंदाच्या हंगामात राशिदने आयपीएलमधील आपल्या 100 विकेट पूर्ण केल्या आहेत. सध्या गुजरात टायटन्स गुणतालिकेत 16 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आज ते लखनौला हरवून आपला पहिला क्रमांक परत एकदा मिळवण्यासाठी मैदानात उतरतील.

Web Title: Rashid Khan Very Close To Reached 450 T20 Wickets And 100 Six In T20

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top