
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रविवारी (२७ एप्रिल) मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सला ५४ धावांनी पराभूत करत हंगामातील ६ वा विजय मिळवला. त्यामुळे आता प्लऑफसाठी मुंबईनेही प्रबळ दावेदारी ठोकली आहे. पण असे असले तरी सामन्याच्या शेवटी चर्चा झाली ती रवी बिश्नोईने जसप्रीत बुमराहविरुद्ध केलेल्या सेलिब्रेशनची.