आयपीएलमध्ये माझ्यावर सहज 15 कोटींची बोली लागली असती : रवी शास्त्री

Ravi Shastri IPL Auction
Ravi Shastri IPL Auctionesakal

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) सध्या त्यांच्या वक्तव्यांमुळे खूप चर्चेत येत असतात. 1983 वर्ल्डकप विजेत्या संघातील एक सदस्य असलेल्या रवी शास्त्रींनी भारतासाठी एक अष्टपैलू म्हणून अनेक महत्वपूर्ण खेळी केल्या आहेत. निवृत्तीनंतर रवी शास्त्री यांनी समालोचकाची भुमिका अत्यंत चोखपणे निभावली. त्यानंतर त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक पदही भुषवले. सध्या ते आयपीएलमध्ये (IPL 2022) हिंदी समालोचनही करत आहेत.

Ravi Shastri IPL Auction
IPL 2022 : चहलचा फ्लाईंग किस, धनश्री खुदकन हसली (VIDEO)

दरम्यान, रवी शास्त्री यांना जर ते आयपीएल लिलावात (IPL Auction) उतरले असते तर त्यांना किती बोली लागली असती असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी 59 वर्षीय रवी शास्त्री यांनी नक्कीचे ते मोठी रक्कम वसूल करणाऱ्या खेळाडूंमध्ये गणले गेले असते असे सांगितले. रवी शास्त्री यांचा भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदाचा (Team India Coach) कार्यकाळ टी 20 वर्ल्डकपनंतर संपुष्टात आला होता. त्यानंतर त्यांनी काही महिने ब्रेक घेतला. आता ते पुन्हा समालोचकाच्या भुमिकेत परतले आहेत.

Ravi Shastri IPL Auction
IPL 2022 : नवी मुंबईत बंगळूर विरुद्ध कोलकाता; कोण मारणार बाजी

शास्त्री यांनी इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना म्हणाले की, 'मी नक्कीच 15 कोटीच्या क्लबमध्ये सामील झालो असतो. याचबरोबर एका संघाचा कर्णधार देखील झालो असतो. यात काहीच शंका नाही यात जास्त विचार करण्याची गरजच नाही.' विशेष म्हणजे शास्त्री जेवढ्या रक्कमेबाबत बोलत आहेत. तेवढी रक्कम महेंद्रसिंह धोनीला देखील 2022 च्या आयपीएल हंगामासाठी मिळालेली नाही.

Ravi Shastri IPL Auction
SRH vs RR : वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी; राजस्थानची अतिसुंदर व्हिक्टरी!

महेंद्रसिंह धोनीला गेल्या वर्षी 15 कोटी पेक्षा जास्त रक्कम मिळाली होती. धोनीने यंदाच्या हंगामात आपल्या पगाराला कात्री लावण्याचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्जने त्याला 12 कोटी रूपये देत रिटने केले. धोनीने आयपीएलचा 15 वा हंगाम सुरू होण्यापूर्वी दोन दिवस आधी धोनीने सीएसकेचे कर्णधारपद देखील सोडले. त्याने अष्टपैलू रविंद्र जडेजाकडे संघाचे नेतृत्व सोपले आहे. त्यामुळे जडेजा यंदाच्या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला सीएसकेने 16 कोटी रुपये देऊन रिटेन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com