
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा आत्तापर्यंत अनेक युवा खेळाडूंनी गाजवली आहे. २० वर्षांखालील वय असणाऱ्या अनेक खेळाडूंनी आपलं नाणं खणखणीत वाजवत भारतीय संघाचे भविष्य उज्ज्वल आहे, याचं चित्र दाखवलंय.
पण बऱ्यचदा लहान वयात मिळालेल्या प्रसिद्धीमुळे काही खेळाडूंचे खेळावरचे लक्ष दूर जाते. अशात आता भारताचे दिग्गज खेळाडू आणि माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या खेळाडूंना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.