शास्त्रींचे बिर्याणी ट्विट व्हायरल; शमी - सिराजला ईदच्या दिल्या हटके शुभेच्छा | Ravi Shastri Wishes Eid Mubarak Mohammad Shami Mohammed Siraj | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ravi Shastri Wishes Mohammad Shami Mohammed Siraj Eid Mubarak

शास्त्रींचे बिर्याणी ट्विट व्हायरल; शमी - सिराजला ईदच्या दिल्या हटके शुभेच्छा

IPL 2022: रमजान ईदचे (Ramzan Eid) औचित्य साधून भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी भारतीय संघातील दोन वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि मोहम्मद सिराजला (Mohammed Siraj) शुभेच्छा दिल्या. मात्र रवी शास्त्रींनी या शुभेच्छा फार हटके पद्धतीने दिल्या. रवी शास्त्रींचे हे ट्विट सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. रवी शास्त्रींनी शुभेच्छा देताना या दोन वेगावान गोलंदाजांचा फोटो शेअर केला. त्यानंतर कॅप्शनमध्ये ते म्हणतात की, 'माझे डबल ट्रबल ईद मुबारक, मोहम्मद शमी आज सामना आहे, बिर्याणी (Biryani) नंतर आता आर या पार, मोहम्मद सिराज तू दोन वेळा बिर्याणी खा.'

हेही वाचा: '2014 पूर्वी पदक तालिकेत भारत कुठेच नसायचा पंतप्रधान मोदी आले अन्.. '

रवी शास्त्रींचे हे हटके ट्विट खूप व्हायरल होत आहे. आज आयपीएलमध्ये 48 व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होत आहे. आयपीएलच्या प्ले ऑफच्या स्पर्धेत गुजरात सर्वात आघाडीवर आहे. गुजरातने आतापर्यंत 9 पैकी 8 सामने जिंकून 16 गुण मिळवले आहेत. ते सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहेत. तर पंजाब गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे.

हेही वाचा: मॅच विनिंग इनिंग खेळण्यापूर्वी रिंकूने हातावर काय गोंदवले?

यंदाच्या हंगामात मोहम्मद शमीने गोलंदाजीच चांगलीच चमक दाखवली आहे. आतापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यात त्याने 14 विकेट घेतल्या आहेत. आजच्या सामन्यात देखील शमीच्या गोलंदाजीवर सर्वांची नजर असणार आहे. दुसरीकडे सिराजसाठी हा हंगाम आतापर्यंत तरी फारसा चांगला गेलेला नाही. त्याने 10 सामन्यात 8 विकेट घेतल्या आहेत.

Web Title: Ravi Shastri Wishes Mohammad Shami Mohammed Siraj Eid Mubarak In Unique Style

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top