मॅच विनिंग इनिंग खेळण्यापूर्वी रिंकूने हातावर काय गोंदवले? | KKR Batsmen Rinku Singh Write On His Hand | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KKR Batsmen Rinku Singh Write On His Hand

मॅच विनिंग इनिंग खेळण्यापूर्वी रिंकूने हातावर काय गोंदवले?

कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) अखेर पाच पराभवानंतर पहिल्यांदा विजयाची चव चाखली. सोमवारी त्यांनी राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. या सामन्यात केकेआर कडून नितीश राणा (Nitish Rana) आणि रिंकू सिंह (Rinku Singh) यांनी दमदार कामगिरी केली. रिंकू सिंहने 23 चेंडूत 42 धावा केल्या. यात सहा चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. या दोघांनी राजस्थानचे 153 धावांचे आव्हान 20 व्या षटकात पार करून दिले. रिंकू सिंहला सामनावीराचा पुरस्कार देखील देण्यात आला.

हेही वाचा: महिला टी 20 चॅलेंज स्पर्धा पुण्यात खेळवण्यात येणार : जय शहा

विशेष म्हणजे आजच्या सामन्यात रिंकू चांगली कामगिरी करणार असे त्याला सामना सुरू होण्यापूर्वीच वाटत होते. त्याने मनातल्या मनात राजस्थान विरूद्ध आपले अर्धशतक ठोकले देखली होते. त्याने आपल्या हातावर 50 हा आकडा लिहिला होता. याबाबतचा खुलासा त्याचा बॅटिंग पार्टनर नितीश राणाने सामना झाल्यानंतर केला. केकेआरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंवटरून शेअर केलेल्या व्हिडिओत रिंकूने आपल्या हातावर लिहिलेले 50 नॉट आऊट दाखवले.

हेही वाचा: 'तुम्ही असे का बोलता सर...' रमजानबद्दलच्या इरफानच्या ट्विटवर कमेंटचा पाऊस

रिंकूने असे करण्याचे कारण देखील सांगितले. तो म्हणाला की आज मी या सामन्यात चांगली कामगिरी करणार असे माला वाटत होते. त्यामुळेच मी माझ्या हातावर हा आकडा लिहिला. रिंकू म्हणाला की मी गेल्या पाच वर्षापासून अशा संधीची वाट पाहत होतो. जर मी रिंकूने या सामन्यात अर्धशतक ठोकले नसले तरी रिंकूने केकेआरसाठी सामना जिंकवणारी खेळी नक्कीच केली. या जोरावर केकेआरने आपला हंगामातील चौथा विजय मिळवला.

दरम्यान, रिंकू मी अशा प्रकारच्या मोठ्या संधीच्या शोधात गेली पाच वर्षे होतो असे म्हणणे खरंच आहे. रिंकू सिंह हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत होता. त्याच्या जोरावर त्याने 2018 मध्येच आयपीएल पदार्पण केले होते. मात्र तेव्हापासून आतापर्यंत त्याला फक्त 13 सामनेच खेळण्याची संधी मिळाली. यावरून त्याला किती कमी संधी मिळाली होती हे दिसून येते.

Web Title: Kkr Batsmen Rinku Singh Write On His Hand 50 Reveal Reason Behind

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top