Ravindra Jadeja: 'साक्षी भाभीनंतर मीच असा व्यक्ती ज्याला...', धोनीबद्दल हे काय म्हणाला जडेजा?

Ravindra Jadeja - MS Dhoni: चेन्नई सुपर किंग्सने पाचव्यांदा आयपीएल जिंकल्यानंतर धोनीने जडेजाला उचलले होते, याबद्दल त्याने भाष्य केले आहे.
MS Dhoni - Ravindra Jadeja | IPL
MS Dhoni - Ravindra Jadeja | IPLX/ChennaiIPL

Chennai Super Kings News: चेन्नई सुपर किंग्स संघ सध्या सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत चांगली कामगिरी करत आहे. दरम्यान, यंदा चेन्नई सुपर किंग्स संघ गतविजेता म्हणून स्पर्धेत उतरला आहे. गेल्यावर्षी चेन्नईने एमएस धोनीच्या नेतृत्वात पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते.

चेन्नईला पाचव्यांदा विजेतेपद जिंकून देण्यात रविंद्र जडेजाने मोलाचा वाटा उचलला होता. दरम्यान, या विजेतेपदानंतर धोनीने जडेजाला उचलून घेतले होते, याच घटनेवर आता जडेजाने एक गमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे.

पावसामुळे आयपीएल 2023 मधील चेन्नई आणि गुजरात टायटन्स यांच्यातील अंतिम सामना राखीव दिवशी झाला होता. चेन्नईसमोर डकवर्थ लुईस नियमानुसार 15 षटकात 171 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते.

MS Dhoni - Ravindra Jadeja | IPL
Rohan Bopanna: रोहन बोपन्नाची घौडदौड चालूच! 44 व्या वर्षी गाठली मियामी ओपन स्पर्धेची फायनल

या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला शेवटच्या 2 चेंडूवर 10 धावांची गरज होती. यावेळी जडेजाने षटकार आणि मग चौकार मारत चेन्नईला विजेतेपद जिंकून दिले होते. त्यावेळी कर्णधार धोनीने त्याला उचलून आनंद व्यक्त केला होता. या क्षणाचा व्हिडिओ आणि फोटो खूप व्हायरल झाले होते.

याच क्षणाची आठवण काढताना एका कार्यक्रमात जडेजा गमतीने म्हणाला की कदाचीत धोनीची पत्नी साक्षीनंतर तो एकमेव व्यक्ती असा आहे, ज्याला धोनीने उचलले आहे.

जडेजा म्हणाला, 'मला वाटतं साक्षी भाभीनंतर मी एकच असा व्यक्ती असेल, ज्याला माही भाईने उचलले असेल.' जडेजाच्या या वाक्यानंतर सर्वच जणांना हसू अनावर झाले. या कार्यक्रमावेळी जडेजासह धोनीही उपस्थित होता.

MS Dhoni - Ravindra Jadeja | IPL
Riyan Parag RR vs DC : राजस्थानचा 'पांढरा हत्ती' कामाला आला; रियाननं गेलेला सामना खेचून आणला

दरम्यान, धोनीनेही जडेजाच्या अंतिम सामन्यातील कामगिरीचे कौतुक केले. तो म्हणाला, 'त्या परिस्थितीत मला विश्वास होता की जड्डूकडे कौशल्य आणि मानसिकता आहे की तो लक्ष्य पूर्ण करू शकतो. पण तरी हेच होईल, याची खात्री नसते. ती अविस्मरणीय खेळी होती.'

'मला वाटतं की शेवटच्या चेंडू आधी त्याने मारलेले काही षटकार कठीण होते. टीव्हीमध्ये पाहाताना खूप सोपं वाटतं. पण आता मी तळातल्या फळीत फलंदाजी करत असल्याने मला माहित आहे की षटकार मारणे त्यावेळी कठीण असते.'

'त्याचबरोबर त्यावेळी सर्वचजण तणावात असतात. प्रतिस्पर्ध्यांनाही जिंकायचे असते, तुम्हालाही जिंकायचे असते. सर्वांनाच मेहनत करावी लागते. मला आनंद आहे की आम्ही जिंकलो. त्यावेळी भावना उंचबळून आलेल्या होत्या. त्यामुळे जड्डूने त्याक्षणी जशी फलंदाजी केली, त्याचे खूप कौतुक.'

दरम्यान, पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद जिंकल्यानंतर आता धोनीने आयपीएल २०२४ पूर्वी चेन्नई संघाचे नेतृत्वपद सोडले असून ऋतुराज गायकवाडकडे ही जबाबदारी सोपवली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com