IPL 2024, Video: चेपॉकवर जडेजा शो! पहिल्याच चेंडूवर कॅच घेतला अन् मग 3 विकेट्स घेत KKR च्या ताफ्यात उडवली खळबळ

Ravindra Jadeja: चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सकडून रविंद्र जडेजाने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले.
Ravindra Jadeja Video
Ravindra Jadeja Video

IPL 2024, CSK vs KKR: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 22 वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळवला जात आहे. एमए चिदंबरम (चेपॉक) स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात रविंद्र जडेजाने त्याच्या क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीने लक्ष वेधले.

या सामन्यात चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कोलकाताकडून फिल सॉल्ट आणि सुनील नारायण यांची सलामी जोडी मैदानात उतरली, तर चेन्नईकडून तुषार देशपांडेने गोलंदाजीची सुरुवात केली. त्याने पहिल्याच चेंडूवर सॉल्टला बाद केलं.

Ravindra Jadeja Video
Rohit Sharma: रोहित करतोय सचिन, द्रविड अन् भज्जीची भन्नाट नक्कल, Video तुफान व्हायरल

तुषारने आऊटसाईड ऑफला टाकलेल्या चेंडूवर सॉल्टने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु, बॉकवर्ड पाँइंटला असलेल्या जडेजाने सॉल्टचा सहज झेल घेतला. त्यामुळे पहिल्याच चेंडूवर चेन्नईला पहिली विकेट मिळाली.

नंतर मात्र नारायणने अंगक्रिश रघुवंशीला साथीला घेत आक्रमक खेळ केला. या दोघांनी पॉवर-प्लेच्या ६ षटकात ५६ धावांची अर्धशतकी भागीदारीही केली. मात्र, यानंतर ७ व्या षटकात चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने रविंद्र जडेजाच्या हातात चेंडू सोपवला आणि जडेजानेही कमाल केली.

त्याने या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रघुवंशीला २४ धावांवर पायचीत केले. याच षटकात जडेजाने कोलकाताला आणखी एक धक्का दिला. त्याने आक्रमक खेळणाऱ्या नारायणला महिश तिक्षणाच्या हातून झेलबाद केले. त्यामुळे नारायण २० चेंडूत २७ धावा करून बाद झाला.

Ravindra Jadeja Video
Rohit Sharma: रोहित करतोय सचिन, द्रविड अन् भज्जीची भन्नाट नक्कल, Video तुफान व्हायरल

यानंतर मात्र, कोलकाताच्या धावांचा पाट आटला. त्यातच 9 व्या षटकात जडेजाने गोलंदाजी करताना धोकादायक वेंकटेश अय्यरलाही बाद केले. त्याचा झेल डॅरिल मिशेलने घेतला. त्यामुळे 6 षटकात 1 बाद 56 धावांवरून 9 षटकात 4 बाद 66 धावा अशी बिकट अवस्था कोलकाताची झाली.

जडेजाच्या गोलंदाजीमुळे कोलकाताच्या धावांच्या गतीला रोख लागला. त्यानंतर आलेले फलंदाज धावांसाठी संघर्ष करताना दिसले. जडेजाने शेवटच्या षटकात कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरचाही झेल घेतला. जडेजाने गोलंदाजी करताना त्याच्या 4 षटकांमध्ये अवघ्या 18 धावा देत 3 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.

दरम्यान, कोलकाताने या सामन्यात 20 षटकात 9 बाद 137 धावा केल्या. चेन्नईकडून जडेजाव्यतिरिक्त तुषार देशपांडेनेही 3 विकेट्स घेतल्या. तसेच मुस्तफिजूर रेहमानने 2 विकेट घेतल्या. तसेच महिश तिक्षणाने 1 विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com