KKR vs RCB, IPL: कोलकाता कायम बेंगळुरूच्या तोंडचा घास पळवतं! आकडेवारीच सांगते सर्व काही

KKR vs RCB, IPL: केकेआर आणि आरसीबी संघात आयपीएलमध्ये अनेक अटीतटीचे सामने झाले असून या दोन संघांनी सर्वात रोमांचक विजय देखील एकमेकांविरुद्ध मिळवले आहेत.
Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bengaluru | IPL 2024
Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bengaluru | IPL 2024X/RCBTweets

KKR vs RCB, IPL: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 36 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघात रविवारी झाला. ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात कोलकाताने 1 धावेने रोमांचकारी विजय मिळवला.

त्यामुळे बेंगळुरूला मात्र आयपीएलच्या 17 व्या हंगामातील एकूण सातव्या, तर सलग सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. इतकेच नाही, बेंगळुरू संघ आयपीएलमध्ये पहिल्यांदाच 1 धावेने पराभूत झाला आहे, तर कोलकाताने पहिल्यांदाच आयपीएलमध्ये 1 धावेने विजय मिळवला आहे.

विशेष म्हणजे यापूर्वी सर्वात कमी धावेने बेंगळुरूला कोलकातानेच पराभूत केले होते. 10 वर्षांपूर्वी म्हणजेच 2014 साली कोलकाताने शारजाहमध्ये झालेल्या आयपीएल सामन्यांत बेंगळुरूला 2 धावांनी पराभूत केले होते.

Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bengaluru | IPL 2024
Balraj Panwar Rowing : रोईंगपटू बलराजनं इतिहास रचला; विक्रमी वेळ नोंदवत पॅरिस ऑलिम्पिकसाठी ठरला पात्र

तसेच बेंगळुरूला सर्वात कमी धावांनी पराभूत व्हावे लागलेल्या सामन्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकावरही कोलकाताविरुद्ध 2008 साली झालेला सामना आहे. कोलकाताला 2008 मध्ये झालेल्या सामन्यात बेंगळुरूला 5 धावांनी पराभूत व्हावे लागले होते. ही आकडेवारी पाहाता, कोलकाताने अनेकदा बेंगळुरूविरुद्ध अटीतटीचे सामने जिंकल्याचे दिसून येते.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला सर्वात कमी धावांनी पराभूत व्हावे लागलेले सामने

  • 1 धावेने पराभव - विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स; कोलकाता, 2024

  • 2 धावेने पराभव - विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स; शारजाह, 2014

  • 4 धावेने पराभव - विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद; अबुधाबी, 2021

  • 5 धावेने पराभव - विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स; कोलकाता, 2008

  • 5 धावेने पराभव - विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद; हैदराबाद, 2018

कोलकाता नाईट रायडर्सने सर्वात कमी धावांनी मिळवलेले विजय

  • 1 धावेने विजय - विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू; कोलकाता, 2024

  • 2 धावांनी विजय - विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू; शारजाह, 2014

  • 2 धावांनी विजय - विरुद्ध पंजाब किंग्स, अबुधाबी; 2020

  • 4 धावांनी विजय - विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद; कोलकाता, 2024

Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bengaluru | IPL 2024
KKR vs RCB सामन्यात राडा! विकेट जाताच विराट अंपायरवर भडकला, नक्की झालं काय?

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 222 धावा केल्या. कोलकाताकडून कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक 50 धावांची खेळी केली, तर फिल सॉल्टने 48 धावा केल्या.

बेंगळुरुकडून गोलंदाजीत यश दयाल आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तसेच मोहम्मद सिराज आणि लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्यानंतर 223 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बेंगळुरूला 20 षटकात सर्वबाद 221 धावाच करता आल्या. शेवटच्या चेंडूवर 3 धावांची गरज असताना मोहम्मद सिराजसह दुहेरी धाव घेताला लॉकी फर्ग्युसन धावबाद झाला. त्यामुळे कोलकाताच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

बेंगळुरूकडून या सामन्यात विल जॅक्सने सर्वाधिक 55 धावांची खेळी केली, तर रजत पाटीदारनेही 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. बाकी कोणत्या प्रमुख फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

कोलकाताकडून गोलंदाजी करताना आंद्रे रसेलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर सुनील नारायण आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच मिचेल स्टार्क आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com