KKR vs RCB सामन्यात राडा! विकेट जाताच विराट अंपायरवर भडकला, नक्की झालं काय?

Virat Kohli Angry: केकेआर विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली बाद झाल्यानंतर अंपायरवर भडकताना दिसला होता.
Virat Kohli Angry
Virat Kohli AngrySakal

Virat Kohli Angry: आयपीएल 2024 मधील 36 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे.

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 222 धावा केल्या आहेत आणि बेंगळुरूसमोर 223 धावांचे आव्हान ठेवले आहे.

या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी बेंगळुरूकडून विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस सलामीला फलंदाजीला उतरले होते. यावेळी विराटने सुरुवातीलाच आक्रमक पवित्रा स्विकारला होता.

मात्र, तिसऱ्या षटकात हर्षित राणा गोलंदाजीला आला. त्याने पहिलाच चेंडू फुलटॉस टाकला, ज्यावर विराटने क्रिजच्या पुढे येत शॉट खेळला. पण त्याचा झेल गोलंदाजी करणाऱ्या राणानेच घेतला. पण विराटच्या मते हा चेंडू त्याच्या कंबरेच्या वर असल्याने नो-बॉल होता. त्यामुळे त्याने रिव्ह्यु घेतला.

Virat Kohli Angry
Virat Kohli: थांब तुला आऊटच करतो... अन् विराटने केलेली नारायणविरुद्ध बॉलिंगची तयारी; KKR vs RCB सामन्याआधीचा Video व्हायरल

यावेळी थर्ड अंपायर मायकल गॉफ यांच्या मते तो चेंडू विराटच्या कंबरेच्या खाली होता. तसेच रिव्ह्युमध्ये बॉल ट्रॅकिंगमध्येही असे दिसले की जर विराट गोलंदाजाने गोलंदाजीला सुरुवात केली, तेव्हा जिथे थांबला होता, तिथे असता तर तो चेंडू त्याच्या कंबरेच्या खाली असता.

त्यामुळे हा चेंडू वैध ठरवण्यात आला आणि त्यामुळे विराटला ७ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांसह 18 धावा करून माघारी परतावे लागले. परंतु, तो बाद होऊन जात असताना त्याला बाद दिल्याच्या निर्णयावरून भडकताना दिसला.

तो मैदानावरील पंचांशी बोलतानाची चिडलेला दिसला. तसेच चिडूनच तो मैदानाबाहेर गेला. तसेच तो बाहेर गेल्यानंतर फाफ डू प्लेसिसही पंचांची चर्चा करताना दिसला.

Virat Kohli Angry
Chandrakant Pandit: टीकाकारांच्या नाकावर टिच्चून केकेआरच्या प्रशिक्षकाला मध्य प्रदेश क्रिकेटने दिली आणखी एक संधी

दरम्यान, या घटनेनंतर पुन्हा एकदा थर्ड अंपायरच्या निर्णयांबद्दल चर्चेला उधाण आले आहे. त्यातच समालोचन करत असताना माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनी विराट नाबाद होता, असं म्हणत त्याला चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याचे म्हटले.

तसेच सोशल मीडियावर काही युजर्सच्या मते देखील थर्ड अंपायरचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले, तर काही युजर्सने थर्ड अंपायरचा योग्य निर्णय असल्याचे म्हटले.

तत्पुर्वी, या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक 50 धावांची खेळी केली, तर सॉल्टने 48 धावा केल्या.

बेंगळुरुकडून यश दयाल आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तसेच मोहम्मद सिराज आणि लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. (Virat Kohli Angry with the decision by the 3rd umpire during KKR vs RCB IPL 2024 Match)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com