
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने मंगळवारी १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएल या प्रतिष्ठेच्या स्पर्धा विजेतेपदावर मोहर उमटवली. बंगळूर संघाने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पंजाब किंग्स संघावर सहा धावांनी विजय साकारत पहिल्यांदाच चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला. पंजाब संघाला दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.