IPL 2023 : आरसीबीसमोर मोठे संकट! घरच्या मैदानावर नाही होणार सामने, मोठे कारण आले समोर

आरसीबी हा आयपीएल 2023 मधील एकमेव संघ आहे जो गेल्या तीन सत्रांपासून सतत प्लेऑफमध्ये जात आहे परंतु...
 RCB Playoffs Scenario
RCB Playoffs Scenario

IPL 2023 RCB Playoffs Scenario : आरसीबी म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगलोर. यावेळी संघाचा कर्णधार फाफ डुप्लेसी करत असला तरी या संघाचा जीव आणि ओळख विराट कोहली आहे.

मागील तीन सामन्यात या संघाचे नेतृत्व विराट कोहली करत आहे, त्यापैकी दोन सामने संघाने जिंकला आहे आणि एक पराभव पत्करला आहे. आरसीबी हा आयपीएल 2023 मधील एकमेव संघ आहे, जो गेल्या तीन सत्रांपासून सतत प्लेऑफमध्ये म्हणजेच टॉप 4 संघांमध्ये प्रवेश करत आहे, परंतु आरसीबीला एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही ही वेगळी बाब आहे.

 RCB Playoffs Scenario
IPL 2023 : "कदाचित आणखी 10 धावा..." चेन्नई 200 धावा करून हरल्यानंतर धोनी गोलंदाज अन् फलंदाजांवर बरसला

यावेळी गुणतालिकेत रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची स्थिती फारशी चांगली नाही. संघ प्लेऑफमध्ये जाऊ शकेल की नाही हे सांगणे कठीण आहे. दरम्यान आता आरसीबीसमोर आणखी एक अडचण निर्माण झाली आहे. संघ आपले पुढचे पाच सामने त्याच्या घरी म्हणजे बंगळुरूमध्ये खेळू शकणार नाही, त्याला विरोधी संघाच्या घरी सामने खेळावे लागतील.

 RCB Playoffs Scenario
Suryakumar Yadav : लाईव्ह मॅचदरम्यान सुर्यकुमार यादवचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

आरसीबी आज म्हणजेच सोमवारी LSG विरुद्ध खेळायला उतरणार आहे. लखनौच्या अटल विहारी बाजपेयी एकना स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. यानंतर 6 मे रोजी संघ दिल्ली कॅपिटल्सशी अरुण जेटली स्टेडियमवर भिडणार आहे.

यानंतर संघ पुन्हा 9 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध सामना खेळणार आहे. 14 मे रोजी राजस्थान रॉयल्सशी होणार आहे, तर 18 मे रोजी संघाचा सामना सनरायझर्स हैदराबादशी सामना होणार आहे.

हे सर्व सामने प्रतिस्पर्धी संघाच्या घरच्या मैदानावर खेळले जाणार आहे, म्हणजे बंगळुरूमध्ये कोणतेही सामने होणार नाहीत. बरं त्यामागे काही विशेष कारण नाही. कर्नाटकात या महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यामुळे तेथे सामने होऊ शकत नाहीत. हे आधीच जाहीर करण्यात आले होते, त्यामुळे बीसीसीआयने असे वेळापत्रक तयार केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com