RCB vs DC Stale Food : कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या अडचणीत वाढ; आरसीबी - दिल्ली सामन्यात शिळं जेवण दिल्याप्रकरणी FIR दाखल

RCB vs DC
RCB vs DC Stale Food ESAKAL

RCB vs DC Stale Food : कुबॉन पार्क पोलीस ठाण्यात कर्नाटक क्रिकेट असोसिएशनविरूद्ध एफआयआर दाखल झाली आहे. आयपीएलच्या 12 मे ला झालेल्या आरसीबी विरूद्ध दिल्लीच्या सामन्यात शिळे खाद्यपदार्थ दिल्याप्रकरणी त्यांच्यावर ही एफआयआर दाखल झाली आहे.

या प्रकरणी कर्नाटक क्रिकेट असोसिएशन आणि कँटीन व्यवस्थापनाविरूद्ध देखील तक्रार दाखल झाली आहे. ही तक्रार 23 वर्षाच्या चौतन्यने दाखल केली आहे. चैतन्य हा 12 मेला आरसीबी आणि दिल्लीविरूद्धचा सामना पाहण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आला होता.

RCB vs DC
RCB vs DC Stale Food : कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या अडचणीत वाढ; आरसीबी - दिल्ली सामन्यात शिळं जेवण दिल्याप्रकरणी FIR दाखल

चैतन्य आणि त्याचा मित्र गौतम हे आरसीबी आणि दिल्लीचा सामना पाहण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमवर गेले होते. ते कतार एअरवेज फॅन टेरेस स्टँडमध्ये बसले होते. सामन्यादरम्यान चैतन्यने स्टँडच्या कॅन्टीनमधील खाद्यपदार्थ घेतले.

त्याने गुलाब जामून, घी राईस आणि दुसरे खाद्य पदार्थ घेतले होते. त्यानंतर त्याचं पोट बिघडलं. त्याची तब्येत इतकी बिघडली की तो स्टँडमध्ये भोवळ येऊन पडला. त्याच्यावर स्टेडियमच्या बाहेर असलेल्या रूग्णवाहिकेत प्राथमिक उपचार करण्यात आले.

RCB vs DC
T20 World Cup 2024 : न्यूयॉर्क की फ्लोरिडा... भारताच्या सराव सामन्याबाबत गोंधळ

त्यानंतर चैतन्य खासगी रूग्णालयातील डॉक्टरांकडे गेला. तेथील डॉक्टरांनी त्याला फूड पॉईजनिंग झाल्याचं सांगितले. त्यानं स्टेडियममध्ये खाल्लेले पदार्थ त्याला बादले असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर चैतन्यने एफआयआर दाखल केली.

(IPL 2024 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com