
Mohammed Siraj Gets Emotional Before Bowling to Virat Kohli
इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना मोहम्मद सिराज याच्यासाठी भावनिक होता. सिराज त्याच्या माजी संघ म्हणजेच RCB विरुद्ध पहिलाच सामना खेळायला मैदानावर उतरला. त्यामुळे त्याच्या भावना दाटून आल्या होत्या. मोहम्मद सिराज भावना लपवू शकला नाही. विराट कोहलीला जेव्हा तो गोलंदाजी करण्यासाठी आला तेव्हा त्याने सुरुवातीली डोळे पुसले.. रन अप घेऊन तो नॉन स्ट्रायरक एंडपर्यंत येईपर्यंत तो अधिक भावनिक झाला आणि चेंडू न टाकता माघारी परतला. हे सर्व स्लीपमध्ये उभा असलेला शुभमन गिल पाहत होता आणि त्याच्या देहबोलीवरून सिराजच्या भावना समजून आल्या.