
इंडियन प्रीमियर लीग २०२५ (IPL) स्पर्धेला ८ दिवसांच्या स्थगितीनंतर आज (१७ मे) पुन्हा सुरूवात झाली. आयपीएल २०२५ मधील ५८ वा सामना रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरूविरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
पण स्थगितीनंतरच्या पहिल्याच सामन्यात पावसाचा अडथळा आला आहे. या सामन्याच्या आधीपासूनच बंगळुरूमध्ये पाऊस पडत आहे. त्यामुळे रात्री ९.३० वाजल्यानंतरही नाणेफक झाली नव्हती. त्यामुळे हा सामना रद्द होण्याची शक्यता वाढली आहे.