IPL मधील नियमामुळे पाँटिंग-गांगुलीचा पंचांशीही वाद, RR vs DC सामनाही अचानक थांबला; जाणून घ्या नक्की झालं काय?

Overseas Player IPL Rule: राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात एका नियमामुळे गोंधळ झाल्याने दिल्ली कॅपिटल्स संघ व्यवस्थानाचे पंचांबरोबर वाद झाल्याचे दिसून आले.
Ricky Ponting | RR vs DC | IPL 2024
Ricky Ponting | RR vs DC | IPL 2024Sakal

IPL 2024, RR vs DC: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत नववा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. जयपूरला झालेला हा सामना राजस्थान रॉयल्सने 12 धावांनी जिंकला. दरम्यान, या सामन्यात एका नियमावरून गोंधळ झाल्याने काही वेळासाठी अडथळा आला होता.

झाले असे की राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सकसमोर 186 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नरने सुरुवातीचे दोन चेंडू खेळले. पण त्यानंतर अचानक काही वेळासाठी सामना थांबला.

झाले असे की दोन चेंडूनंतर दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि क्रिकेट संचालक सौरव गांगुली फोर्थ अंपायरशी काहीतरी रागात बोलताना दिसले. त्यांनी चार परदेशी खेळाडूंच्या नियमावरून चर्चा केली असल्याचे समजत आहे.

Ricky Ponting | RR vs DC | IPL 2024
IPL 2024: 16 वर्षीय खेळाडूची KKR संघात एन्ट्री, केशव महाराजलाही मिळाली 'या' संघात संधी

खरंतर राजस्थान रॉयल्सने चार नाही, तर पाच खेळाडू खेळवले असा समज झाल्याने दिल्ली कॅपिटल्सने शंका उपस्थित केली होती. त्यांना नियमाबाबत गोंधळ झाला होता. मात्र, नंतर पंचांनी संघाची शीट दाखवत त्यांचा गोंधळ दूर केला.

झाले असे की राजस्थान रॉयल्सने सुरुवातीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जॉस बटलर, शिमरॉन हेटमायर आणि ट्रेंट बोल्ट यांना संधी दिली होती.

त्यानंतर दुसऱ्या डावात त्यांनी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून हेटमायरच्या जागेवर नांद्रे बर्गरला संधी दिली होती. तसेच दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षणासाठी शुभम दुबे बाहेर गेल्याने रोवमन पॉवेल त्याच्या जागेवर केवळ क्षेत्ररक्षणासाठी बदली क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात आला होता.

Ricky Ponting | RR vs DC | IPL 2024
R Ashwin: 'कधीकधी आश्चर्य वाटतं की IPL क्रिकेटही आहे का?', अश्विनचं खळबळजनक भाष्य

परंतु, दिल्ली संघाला असा गैरसमज झाला की राजस्थान 5 परदेशी खेळाडूंना खेळवत आहे. पण खरंतर क्षेत्ररक्षणावेळी मैदानात राजस्थानकडून केवळ 4 परदेशी खेळाडू क्षेत्ररक्षण करत होते.

बर्गर हेटमायरऐवजी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून संघात आल्याने हेटमायर मैदानात नव्हता. त्यामुळे मैदानात बर्गर, बोल्ट, बटलर आणि पॉवेल हे चारच परदेशी खेळाडू मैदानात होते. दरम्यान, नियम पाँटिंग आणि गांगुलीला समजावल्यानंतर पुन्हा खेळ सुरू झाला.

आयपीएलच्या नियमानुसार कोणताही संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये 4 पेक्षा जास्त परदेशी खेळाडू खेळवू शकत नाही. तसेच क्षेत्ररक्षणावेळीही संघाचे 4 पेक्षा अधिक परदेशी खेळाडू मैदानात असू शकत नाहीत.

जर संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये आधीच 4 परदेशी खेळाडूंना जागा दिली असेल, तर परदेशी बदली क्षेत्ररक्षक केवळ दुसऱ्या परदेशी खेळाडूंच्याच जागेवर मैदानात जाऊ शकतो.

जर संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये 4 पेक्षा कमी परदेशी खेळाडूंना संधी दिली असेल, तर परदेशी बदली क्षेत्ररक्षक मैदानात येऊ शकतो, पण अशावेळी मैदानातील संघाच्या परदेशी खेळाडूंची संख्या 4 पेक्षा अधिक होता कामा नये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com