LSG vs DC, IPL 2024: ऋषभ पंतचे ब्रेनफेड की अंपायरचा गैरसमज? दिल्ली-लखनौ सामन्यात DRS इशाऱ्यामुळे वाद

Rishabh Pant DRS: लखनौ सुपर जायंट्स संघाविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने केलेल्या डीआरएसच्या इशाऱ्यामुळे सामन्यादरम्यान त्याचा पंचांबरोबर वाद झाल्याचे दिसून आले.
Rishabh Pant | LSG vs DC
Rishabh Pant | LSG vs DCSakal

Rishabh Pant News: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 26 वा सामना शुक्रवारी (12 एप्रिल) लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने 6 विकेट्सने विजय मिळवला.

मात्र असे असले तरी दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतच्या एका कृतीने झालेल्या वादाची मोठी चर्चा झाली.

झाले असे की लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांनी पहिल्या तीन षटकातच क्विंटन डी कॉकची विकेट गमावली होती. त्यानंतर चौथ्या षटकात दिल्लीकडून इशांत शर्मा गोलंदाजी करत होता.

Rishabh Pant | LSG vs DC
LSG vs DC : शेवटी कुलदीपच उभा राहिला! दिल्लीनं डिफेंडर लखनौचा डिफेन्स भेदला

इशांतने पहिल्या तीन चेंडूंमध्ये एक चेंडू वाईड टाकलेला होता. त्यानंतर त्याने चौथा चेंडूही त्याने वाईड टाकला. हा चेंडू लेग स्टंपच्या लाईनच्या जवळ होता. या चेंडूवर लखनौकडून फलंदाजी करत असलेल्या देवदत्त पडिक्कलला शॉट खेळण्यात अपयश आले.

त्यावेळी पंचांनी हा चेंडू वाईड दिलेला. यावेळी पंतने त्याच्या संघसहकाऱ्यांबरोबर चर्चा करत असताना रिव्ह्यु घेण्यासाठी जसा इशारा करतात, तसाच इशारा केला. पंचांनी त्याचा इशारा पाहिला आणि त्यांनी तिसऱ्या पंचांना याबद्दल सांगितले.

त्यानंतर रिप्लेमध्ये स्पष्ट झाले की इशांतने वाईड बॉल टाकला होता आणि त्यामुळे दिल्लीचा एक रिव्ह्यू वाया गेला. मात्र, यानंतर पंत थेट पंचांकडे गेला आणि त्याने सांगितले की त्याने रिव्ह्यू घेतला नव्हता, त्याच्या इशाऱ्याबाबत पंचांकडून गैरसमज झाला, असं त्याचं म्हणणं होतं.

यावर बराच काळ चर्चा झाली. पण नंतर रिप्लेमध्ये स्पष्ट दिसले की पंतने डीआरएसचा इशारा केला होता. त्यामुळे दिल्लीला रिव्ह्यू गमवावा लागला.

दरम्यान या घटनेवर चर्चा होत आहे की कदाचित पंत त्याच्या सहकाऱ्यांशी बोलताना रिव्ह्युबद्दल विचारत असावा की रिव्ह्यू घ्यावा की नाही. मात्र, एकदा घेतलेला निर्णय बदलला जाऊ शकत नाही, त्यामुळे पंतला हा निर्णय मान्य करावाच लागला.

Rishabh Pant | LSG vs DC
Virat Kohli Video : किंग कोहलीच्या एका कृतीने हार्दिकचा विरोध मावळला; रोहितला जमलं नाही विराटनं करून दाखवलं

दरम्यान, या घटनेबाबत क्रिकबझशी बोलताना ऍडम गिलख्रिस्ट म्हणाला की या घटनेबद्दल पंतला दंड व्हायला पाहिजे कारण त्याने पंचांबरोबर जवळपास 5 मिनिटे वाद घातला होता.

गिलख्रिस्ट म्हणाला, 'मी आज आणखी एक उदाहरण पाहिले की जिथे पंचांनी सामन्यावर अधिक नियंत्रण ठेवायला पाहिजे होतं. त्यांनी सामना पुढे नेण्याचाच विचार करायला हवा. ऋषभने रिव्ह्यू घेतला होता की नाही, हा वादाचा विषय ठरू शकतो. ते सर्व ठिक आहे की कदाचित त्याच्या रिव्ह्यूबाबत गैरसमज झाला असेल. पण त्यांनी तिथे थांबून 3-4 मिनिटे चर्चा केली.'

'मला असं वाटतं की ती खूपच साधी चर्चा असेल. ऋषभ किंवा इतर कोणताही खेळाडू कितीही तक्रार करत असला, तरी पंचांनी स्पष्ट सांगायला हवे की हे घडून गेलं आहे आणि पुढे जाऊया. पण ते बोलतच राहिले. त्याला दंड व्हायला पाहिजे.'

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले तर या सामन्यात लखनौने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात 7 बाद 167 धावा केल्या होत्या. त्यानंतर 168 धावांच्या आव्हानाचा पाठलाग दिल्लीने 18.1 षटकात 4 विकेट्स गमावत 170 धावा करून पूर्ण केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com