Team India Squad T20WC 2024 : पंत टी 20 वर्ल्डकपसाठी तयार आहे की नाही... गांगुली अन् पाँटिंगनं स्पष्टच सांगितलं

Rishabh Pant Team India Squad T20WC 2024
Rishabh Pant Team India Squad T20WC 2024 esakal

Rishabh Pant Team India Squad T20WC 2024 : आयसीसी टी 20 वर्ल्डकप सुरू होण्यासाठी फक्त दोन आठवडे शिल्लक राहिले आहेत. बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा अजून केलेली नाही. भारताचा विकेटकिपर ऋषभ पंत भारतीय संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग या दोघांनीही पंत संघात पुनरामगमन करेल असा विश्वास आहे. तो आयसीसी टी 20 वर्ल्डकप नक्की खेळेल असं दोघांनाही वाटतं.

Rishabh Pant Team India Squad T20WC 2024
RR vs MI: जैस्वालचं शतक अन् रोहितची शाबासकीची थाप; मुंबई-राजस्थान सामन्यातील तो Video चर्चेत

अपघातानंतर ऋषभ पंतने सर्व दुखापतींवर मात करत आयपीएल 2024 मध्ये धडाकेबाज पुनरागमन केलं आहे. आता बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमनं देखील त्याला फिट घोषित करत त्याचा वर्ल्डकप खेळण्याचा मार्ग मोकळा केला आहे. मात्र बीसीसीआय पंतच्या तंदुरूस्तीबाबत सावध पावलं टाकत आहे.

आयपीएलच्या पहिल्या काही सामन्यात तो थोडा संघर्ष करत होता. मात्र त्यानंतर पाठोपाठ अर्धशतकी खेळी करत आपण पुनरागमन केलं असल्याचं दाखवून दिलं. पंतने 8 सामन्यात 254 धावा केल्या आहेत. त्यात 2 अर्धशतकांचा देखील समावेश आहे. विकेटकिपिंमध्ये देखील त्यानं दमदार कामगिरी केली आहे.

दरम्यान, सौरव गांगुली आणि रिकी पाँटिंग या दोघांनीही पंतच्या वर्ल्डकप खेळण्याबाबत सकारात्मक मतं नोंदवलं. सौरव गांगुली म्हणाला की, 'ऋषभ पंत हा टी 20 वर्ल्डकप खेळणार असं मला वाटतं. फक्त 15 खेळाडूंचीच निवड होणार आहे. हे प्रत्येक खेळात होतं. तो परिपूर्ण आहे. तो नक्कीत संघात खेळेल मला खात्री आहे की तो नक्की वेस्ट इंडीजला जाईल.'

Rishabh Pant Team India Squad T20WC 2024
Sanju Samson: 'सॅमसनला रोहितनंतर भारताचा टी20 कर्णधार म्हणून तयार करावं', असं कोण म्हणालं?

गांगुली पुढे म्हणला की, 'तो मधल्या फळीत फलंदाजी करेल. टी 20 क्रिकेटमध्ये कोणत्या नंबरवर करेल हे सांगणं कठिण आहे. कारण डावं - उजवं कॉम्बिनेशन, कोण गोलंदाजी करतंय, सामन्याची परिस्थिती काय आहे यावर सर्व अवलंबून असेल.'

'नंबर 3 पासून 7 पर्यंतच्या फलंदाजांना कोणालाही त्यांचा फलंदाजीचा क्रमांका फिक्स असेल असं सांगता येत नाही. टी 20 क्रिकेटमध्ये तरी तसं होत नाही.'

दिल्ली कॅपिटल्सचा कोच रिकी पाँटिंग म्हणाला की, 'गेल्या दोन आठवड्यापासून मला हा प्रश्न कायम विचारला जात आहे. मला वाटतं की तो संघात नक्की असेल. तो एक चांगला खेळाडू आहे. जर भारताने त्याला संघात घेतलं नाही तर नक्कीच मोठा परिणाम होऊ शकतो.'

(IPL 2024 Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com