BCCI Cracks Down On LSG: Pant And Playing XI Penalised : लखनौ सुपर जायंट्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या शेवटच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यात LSG चा कर्णधार रिषभ पंत याने नाबाद ११८ धावा कुटल्या, परंतु फॉर्म परतण्यासाठी बराच उशीर झाला. या सामन्यानंतर बीसीसीआयने रिषभवर दंडात्मक कारवाई केली, कारण त्याने आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे त्याला ३० लाखांचा दंड भरावा लागला आणि प्लेइंग इलेव्हनमधील सर्व खेळाडूंनाही दंड बसला.