Rishabh Pant : दिल्ली कॅपिटल्सची मोठी घोषणा! IPL 2023 मध्ये ऋषभ पंतची संघात एंट्री

 Rishabh Pant
Rishabh Pantsakal

IPL 2023 Rishabh Pant : आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना लखनौ सुपर जायंट्ससोबत खेळल्या गेला. या सामन्यात नियमित कर्णधार ऋषभ पंत खेळायला नव्हता. गेल्या वर्षी कार अपघाताचा तो बळी ठरला होता. या घटनेमुळे तो संपूर्ण मोसमातून बाहेर पडला असून डेव्हिड वॉर्नर दिल्लीचे कर्णधारपद सांभाळत आहे.

दरम्यान, ऋषभ पंतच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या पुढील सामन्यात तो चाहत्यांमध्ये मैदानावर दिसणार आहे.

 Rishabh Pant
IPL 2023 : तो एकच शॉट... अन् मराठमोळ्या ऋतुराजने जिंकले पाच लाख!

दिल्ली कॅपिटल्सचा पुढील सामना उद्या (४ एप्रिल) गुजरात टायटन्सविरुद्ध होणार आहे. या सामन्यात ऋषभ पंत सहभागी होणार आहे. या सामन्यादरम्यान ऋषभ पंत दिल्लीला साथ देण्यासाठी स्टेडियमवर येणार आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशननेही अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यादरम्यान ऋषभ पंत उपस्थित राहणार असल्याची पुष्टी केली आहे.

 Rishabh Pant
IPL 2023: सामना सुरू होण्यापूर्वीच मैदानात घडली एक विचित्र घटना, खेळाडूही थक्क!

दिल्ली आणि लखनौ दरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान ऋषभ पंतची उपस्थिती जाणवण्यासाठी संघाने त्याची 17 क्रमांकाची जर्सी डगआउटमध्ये टांगली होती. आयपीएल 2023 सुरू होण्यापूर्वीच दिल्ली संघाने स्पष्ट केले होते की संपूर्ण हंगामात पंतची जर्सी त्यांच्याकडे राहील.

त्याचवेळी संघाचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी संघाचे मनोबल वाढवण्यासाठी ऋषभ पंतला स्टेडियममध्ये आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. कोचिंग स्टाफ आणि ऑनरलाही त्यांच्या नियमित कर्णधाराची उणीव भासत आहे.

30 डिसेंबर 2022 रोजी पहाटे 5.30 च्या सुमारास रुरकीच्या नरसन सीमेवरील हम्मादपूर झालजवळ ऋषभ पंतची कार रेलिंगला धडकली. या अपघातानंतर कारने पेट घेतला आणि पंत गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर त्याला डेहराडूनमध्ये दाखल करण्यात आले, त्यानंतर विमानाने मुंबईला नेण्यात आले. पंतच्या गुडघाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ऋषभ पंतला सध्या सामन्यात पुनरागमन करण्यासाठी बराच वेळ लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com