Rishabh Pant RR vs DC : ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना आज करणार मोठा विक्रम, अशी कामगिरी करणारा ठरणार फ्रेंचायजीचा पहिला फलंदाज

Rishabh Pant
Rishabh Pant esakal

Rishabh Pant RR vs DC IPL 2024 : राजस्थानच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर आज राजस्थान रॉयल्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स असा सामना रंगणार आहे. आयपीएलच्या 9 व्या सामन्यात संजू सॅमसन आणि ऋषभ पंत हे दोन युवा विकेटकिपर एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

विशेष म्हणजे दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत भीषण अपघातानंतर नुकताच व्यावसायिक क्रिकेटमध्ये परतला आहे. पंत आज दिल्लीकडून आपला 100 वा आयपीएल सामना खेळणार आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून 100 वा सामना खेळणारा ऋषभ पंत हा पहिला खेळाडू होणार आहे.

Rishabh Pant
IPL 2024 : 'चप्पल तुझी वाट बघतीये...' तुफानी अर्धशतक ठोकल्यानंतरही अभिषेकवर भडकला युवराज सिंग, ट्विट व्हायरल

ऋषभ पंतचा डिसेंबर 2022 मध्ये अपघात झाला होता. त्यावेळी त्याच्या कारने पेट देखील घेतला. पंत या अपघातातून वाचला. मात्र त्याच्या गुडघ्या जबर दुखापत झाल्याने त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. जवळपास 14 महिने क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर आता पंत क्रिकेटच्या मैदानावर उतरला आहे. तो विकेटकिपिंग आणि दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व देखील करत आहे.

ऋषभ पंतची आयपीएल कारकीर्द

ऋषभ पंतने 2016 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळण्यास सुरूवात केली होती. त्याने दिल्लीकडूनच आयपीएल पदार्पण केलं होतं. तेव्हापासून आजपर्यंत ऋषभ पंत हा दिल्ली कॅपिटल्सशीच जोडला गेला आहे. 2016 नंतर पंत फक्त एका आयपीएल हंगाम मुकला आहे. 2023 च्या आयपीएल हंगामात तो दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता.

Rishabh Pant
SRH Vs MI : मुंबईच्या पराभवानंतर रोहित शर्माने सर्वांसमोर घेतली कर्णधार हार्दिक पांड्याची शाळा...

पंतने आतापर्यंत आयपीएलमध्ये 99 सामने खेळले असून जवळपास 35 च्या सरासरीने 2856 धावा केल्या आहेत. त्याने या धावा 148 च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत. तो टी 20 क्रिकेटमधील एक उत्तम खेळाडू असल्याचे सिद्ध होते.

(IPL Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com