
Riyan Parag’s Embarrassing Stat : रियान पराग काल कर्णधार म्हणून आपल्या घरच्या मैदानावर पहिला सामना खेळला. आसामच्या बर्सापरा क्रिकेट स्टेडियमवर काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना झाला. पण, परागसाठी हा सामना लाजीरवाणा विक्रमाची नोंद करणारा ठरला.
RR ला इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या पर्वात सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. KKR ने ८ विकेट्स राखून हा सामना जिंकला. भारतीय संघाकडून खेळणारा रियान हा आसामचा पहिला खेळाडू आहे आणि आता तो आयपीएलमध्ये नेतृत्व करणाराही पहिला आसामी खेळाडू ठरला आहे.