Rohit Sharma Crying : पुन्हा एकदा फ्लॉप ठरल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये रोहित शर्माला अश्रू अनावर; व्हिडिओ व्हायरल

Rohit Sharma Crying in Dressing Room : आयपीएल 2024 मधील 55 वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात सूर्यकुमार यादवची तुफानी फलंदाजी पाहायला मिळाली.
Rohit Sharma Crying in Dressing Room News Marathi
Rohit Sharma Crying in Dressing Room News Marathisakal

Rohit Sharma Crying in Dressing Room : आयपीएल 2024 मधील 55 वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात सूर्यकुमार यादवची तुफानी फलंदाजी पाहायला मिळाली. सूर्याने हैदराबादविरुद्ध शानदार शतक ठोकले. त्यामुळे मुंबईने हैदराबादचा ७ गडी राखून पराभव केला.

या सामन्यात रोहित शर्मा पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. यानंतर रोहितला सोशल मीडियावर ट्रोल केले जाऊ लागले. पण त्यादरम्यान हिटमॅनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा रडताना दिसत आहे.

Rohit Sharma Crying in Dressing Room News Marathi
IPL 2024, MI vs SRH: विंटेज पीयूष चावला, हार्दिकची भेदक गोलंदाजी अन् सूर्याचा शतकी तडाखा; मुंबईला अखेर गवसला विजय

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला रोहित शर्माचा व्हिडीओ कोणत्या सामन्याचा आहे, याबाबत कोणतीही माहिती नाही. रोहित शर्मा हैदराबादविरुद्ध अवघ्या 4 धावा करून बाद झाला. यानंतर सोशल मीडियावर विविध प्रकारच्या पोस्ट शेअर केल्या जाऊ लागल्या. त्यापैकी एका ड्रेसिंग रूममधून रोहितचा रडण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. रोहितच्या या व्हिडिओवर चाहतेही विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत. तसेच हिटमॅनचा हा व्हिडिओ पाहून काही चाहते भावूक होत आहेत.

Rohit Sharma Crying in Dressing Room News Marathi
IPL 2024: सूर्यकुमारचं रेकॉर्डब्रेक शतक, तर तिलकसह रचली विक्रमी पार्टनरशीप; MI vs SRH सामन्यातील 4 खास विक्रम

@Melbourne__82 या खात्याद्वारे X वर व्हिडिओ शेअर केला गेला आहे. व्हिडिओ जुना दिसत असला तरी. एका यूजरने पोस्ट शेअर करत लिहिले की, तुमच्या खराब 'आयपीएल' फॉर्ममुळे आज लोक तुम्हाला ट्रोल करत आहेत.

आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी अत्यंत खराब झाली. खराब कामगिरीमुळे संघाचा नवा कर्णधार हार्दिक पांड्यालाही ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. मुंबईने आतापर्यंत १२ सामने खेळले आहेत. मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com