
रविवारी (१ जून) रोजी मुंबई इंडियन्सचे इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील आव्हान संपले. मुंबई इंडियन्सला रविवारी अहमदाबादमध्ये झालेल्या क्वालिफायर २ सामन्यात पंजाब किंग्सविरुद्ध ५ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला.
या सामन्यानंतर मुंबई इंडियन्स स्पर्धेतून बाहेर झाले असल्याने त्यांचे ६ व्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न यंदा तुटले. या सामन्यानंतर संघातील खेळाडू परत आपापल्या घरी परतण्यापूर्वी एकमेकांचा ड्रेसिंग रुममध्ये निरोप घेताना दिसले.