IPL 2024 : हार्दिक पांड्याचा होणार पत्ता कट? रोहित पुन्हा बनणार मुंबईचा कर्णधार... क्रीडा मंत्र्यांचा मोठा दावा

मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत तिन्ही सामने गमावले आहेत. आणि हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून पूर्णपणे अपयशी ठरला आहे.
Rohit Sharma IPL 2024 News Marathi
Rohit Sharma IPL 2024 News Marathisakal

IPL 2024 Mumbai Indians : मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत तिन्ही सामने गमावले आहेत. आणि हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून पूर्णपणे अपयशी ठरला आहे. या हंगामात 5 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या रोहित शर्माच्या जागी फ्रँचायझीने स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले. पण मुंबईच्या चाहत्यांना हे आवडले नाही आणि त्यामुळे पांड्याला सतत ट्रोल करत आहेत.

Rohit Sharma IPL 2024 News Marathi
BCCI ने IPL 2024 च्या शेड्यूलमध्ये अचानक केला मोठा बदल! जाणून घ्या कोणत्या सामन्यांच्या बदलल्या तारखा

दरम्यान, एका शोमध्ये याबद्दल बोलत असताना भारतीय क्रिकेटर आणि पश्चिम बंगालचा क्रीडा मंत्री मनोज तिवारीने मोठे वक्तव्य केले आहे. तिवारी म्हणाला की, मुंबईला आता आपला पुढचा सामना 7 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध खेळायचा आहे. अशा स्थितीत फ्रँचायझीला मोठा ब्रेक मिळाला आहे आणि या काळात ते मोठा निर्णय घेऊ शकतात. फ्रँचायझी पुन्हा रोहितकडे कर्णधारपद सोपवू शकते.

क्रिकबझ शोमध्ये मनोज तिवारी जेव्हा हे बोलत होते, तेव्हा त्यांच्यासोबत वीरेंद्र सेहवागही उपस्थित होता, त्यांचे हे शब्द ऐकून त्यांना धक्काच बसला. सेहवाग म्हणाला की, हो असे होऊ शकते, पण तिवारी हे लवकर बोलत आहे. किमान 7 सामने झाले पाहिजेत, त्यानंतर आपण बोलू शकतो.

Rohit Sharma IPL 2024 News Marathi
Champions League T20 : टी-20 चा थरार आणखी वाढणार...! 10 वर्षांपूर्वी बंद झालेली लीग BCCI पुन्हा सुरू करणार?

मनोज तिवारी म्हणाला की, 'मला वाटतं हार्दिक पांड्या दडपणाखाली आहे, कदाचित त्यामुळेच हार्दिक पांड्याने राजस्थानविरुद्ध मुंबईसाठी गोलंदाजी केली नाही. पण त्यावेळी त्याने गोलंदाजी करायला हवी होती. मात्र दबावामुळे त्याने ते केले नाही. मला वाटते की या ब्रेक दरम्यान (रविवारपर्यंत) मुंबई इंडियन्स फ्रँचायझी मोठा निर्णय घेऊन रोहित शर्माला पुन्हा कर्णधार बनवू शकते. कारण जेवढे मला फ्रँचायझी क्रिकेट किंवा त्यांचे मालक समजतात, तेवढे ते निर्णय घेण्यास मागेपुढे पाहत नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com