Rohit Sharma : टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये 'हा' खेळाडू देतो जास्त शिव्या.... भारतीय कर्णधार रोहितचा मोठा खुलासा

Rohit Sharma and Shreyas Iyer Kapil Sharma Show : श्रेयस अय्यर आणि रोहित शर्मा द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये गेले होते.
Rohit Sharma and Shreyas Iyer kapil sharma show news
Rohit Sharma and Shreyas Iyer kapil sharma show newssakal

Rohit Sharma and Shreyas Iyer : भारतीय क्रिकेट संघाचा मधल्या फळीतील स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला आपला आदर्श म्हटले आहे. खरं तर श्रेयस अय्यर आणि रोहित शर्मा द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये गेले होते. त्यावेळी श्रेयस अय्यरने सांगितले की, रोहित शर्मा हा त्याचा आदर्श आहे आणि तो हिटमॅनचा खेळ पाहत मोठा झाला आहे. अय्यरच्या या प्रामाणिक खुलाशानंतर रोहित शर्माने श्रेयसबाबत मोठा खुलासा केला आहे.

Rohit Sharma and Shreyas Iyer kapil sharma show news
RCB Vs RR : सामन्यादरम्यान विराट कोहलीने युझवेंद्र चहलला दिली थप्पड मारण्याची धमकी? व्हिडिओ व्हायरल

श्रेयस अय्यर म्हणाला की, मी त्याची चेष्टा करत नाही... पण रोहित भाई लहानपणापासूनच माझा आदर्श आहे कारण तोही मुंबईचा आहे आणि मीही तिथलाच आहे.... आणि मी त्याला बघतच मोठा झालो आहे. श्रेयसने हे म्हटल्यानंतर कपिल शर्मा म्हणाला की, तू हे बोलत आहेस कारण तू कॅमेरासोबत आहेस आणि कर्णधार रोहित शर्माही तुझ्यासमोर आहे. यावर रोहित शर्मा म्हणाला की, हा तोच आहे जो ड्रेसिंग रूममध्ये खूप शिव्या देतो. आणि आजकाल हे तरुण पोर खुप धोकादायक आहेत.

Rohit Sharma and Shreyas Iyer kapil sharma show news
IPL 2024 : RCB विरुद्धच्या पराभवानंतर संजूच्या RR बसला मोठा धक्का! वेगवान गोलंदाज पुढच्या सामन्यातून बाहेर

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये श्रेयस अय्यर खेळला होता. त्याने या वर्ल्ड कपमध्ये 11 सामन्यांमध्ये 530 धावा केल्या. भारतासाठी 2023 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहलीने सर्वाधिक 765 धावा केल्या होत्या तर रोहित शर्माने 597 धावा केल्या होत्या.

श्रेयस अय्यर सध्या आयपीएल 2024 मध्ये खेळत आहे आणि केकेआरचे नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली केकेआरने पहिले तीन सामने जिंकले आहेत आणि 6 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. केकेआरला आता या मोसमातील पुढील सामना 8 एप्रिल रोजी कोलकाता येथे CSK विरुद्ध खेळायचा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com