
रोहित शर्माचा एक सिक्स आणि गेंड्यांना मिळालं ५ लाखांचं गिफ्ट; काय आहे प्रकरण?
गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएलचा 51 सामना खेळला गेला. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने गुजरात टायटन्सविरुद्ध स्फोटक फलंदाजी करताना 43 धावांची खेळी केली. यादरम्यान रोहितच्या बॅटमधून असा षटकार मारला, ज्यामुळे काझीरंगाच्या गेंड्यांना भेट म्हणून पूर्ण 5 लाख रुपये मिळणार आहेत.
रोहित शर्माने मुंबईच्या डावातील दुसऱ्या षटकात कॅरेबियन गोलंदाज अल्जारी जोसेफच्या लेन्थ बॉलवर एक आकर्षक शॉट खेळला. रोहितच्या बॅटमधून निघालेला हा चेंडू थेट डीप मिडविकेटच्या सीमारेषेबाहेर उभ्या असलेल्या टाटा पंच कारवर जाऊन आदळला. या शॉटने रोहितच्या खात्यात सहा धावा जमा झाल्या, तर आसामच्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील गेंड्यांला भेट म्हणून पाच लाख रुपयांचा फायदा झाला.(Rohit Sharma Six Scratch On Tata Punch Kaziranga National Park 5 Lakhs Gift TATA IPL)
हेही वाचा: जिंकली मुंबई इंडियन्स; पण हवा मात्र रणवीर सिंगचीच!
टाटा मोटर्स आयपीएल प्रायोजित करत आहे. अशा स्थितीत त्यांच्याकडून अशी घोषणा करण्यात आली की, जर कोणत्याही फलंदाजाने त्यांच्या टाटा पंच कार किंवा टाटा पंच बोर्डावर शॉट मारला तर आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला (Kaziranga National Park) पाच लाख रुपये दिले जातील. यामुळे आता कोणत्या ना कोणत्या मार्गाने रोहितने चांगल्या कामात हातभार लावला आहे.
हेही वाचा: कहीं खुशी कहीं गम! हार्दिकची नताशा हिरमुसली तर रोहितच्या रितिकाची कळी खुलली...
दुसरीकडे या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, रोहित शर्माच्या संघाने गुजरात टायटन्सला 178 धावांचे लक्ष्य दिले आहे. या सामन्यात रोहित शर्माने 28 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 43 धावा केल्या. प्रत्युत्तरात हार्दिक पांड्याच्या गुजरातने 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 172 धावा केल्या. मुंबई इंडियन्सने हा सामना पाच धावांनी जिंकला.
Web Title: Rohit Sharma Six Scratch On Tata Punch Kaziranga National Park Got 5 Lakhs Gift Tata Ipl 2022 Gt Vs Mi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..