Rohit Sharma 81-run innings vs Gujarat Titans : शुक्रवारी झालेल्या आयपीएल 2025 च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा 20 धावांनी पराभव केला. या सामन्यात मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्माने 50 चेंडूंमध्ये 81 धावांची शानदार खेळी करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.