
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आत्तापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. बंगळुरूने ११ सामन्यांपैकी ८ सामने जिंकले असून ३ सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांचे १६ गुण असून ते दुसऱ्या क्रमांकावरही आहे. त्यामुळे बंगळुरूचे प्लेऑफमधील स्थानही जवळपास पक्के मानले जात आहे.
असे असताच आयपीएल २०२५ स्पर्धा ९ मे रोजी स्थगित झाली. त्यानंतर आता भारत - पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी झाल्यानंतर पुन्हा १७ मे पासून आयपीएल २०२५ला सुरुवात होणार आहे. मात्र आता आयपीएल पुन्हा सुरू होत असताना बंगळुरूला मोठे धक्के बसणार आहेत.