Rajasthan Royals vs Lucknow Super Giants Marathi Update: राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मधील लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला ( Vaibhav Suryavanshi )पदार्पणाची संधी दिली आङे. संजू सॅमसन दुखापतीमुळे आजच्या सामन्याला मुकल्याने रियान पराग नेतृत्व करतोय. LSG चा कर्णधार रिषभ पंतने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्याने वैभला इम्पॅक्ट प्लेअरच्या लिस्टमध्ये ठेवले गेले आहे. पण, त्याने पदार्पणाच्या सामन्यातच मोठा विक्रम नावावर केला. आयपीएल खेळणारा तो सर्वात युवा खेळाडू ठरला. वैभव १४ वर्ष व २३ दिवसांचा आहे.