IPL 2024 RCB VS RR : संजू सॅमसनची सेना मारला विजयाचा 'चौकार' की बंगळूरु रोखणार राजस्थानचा विजयरथ?

Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात सलग तीन सामन्यांत विजय संपादन करणारा राजस्थान रॉयल्सचा संघ आता आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा सामना करणार आहे.
IPL 2024 RCB VS RR
IPL 2024 RCB VS RRsakal

Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात सलग तीन सामन्यांत विजय संपादन करणारा राजस्थान रॉयल्सचा संघ आता आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा सामना करणार आहे. राजस्थानचा संघ विजयाचा चौकार मारण्यासाठी मैदानात उतरेल, तर बंगळूरुचा संघ सलग तिसरा पराभव टाळण्याचा प्रयत्न करेल.

संजू सॅमसनच्या नेतृत्वात विजयरथावर रूढ झालेल्या राजस्थानला बंगळूरुचा संघ रोखणार का, या प्रश्‍नाचे उत्तर शनिवारी जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियममध्ये मिळेल.

IPL 2024 RCB VS RR
SRH vs CSK : डोकेबाज गोलंदाज आहे कर्णधार! हैदराबादनं मुंबईनंतर आता चेन्नईचा देखील माज उतरवला

गुरुवार रात्रीपर्यंतच्या लढतींच्या निकालानंतर राजस्थान गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असून बंगळूरचा संघ आठव्या स्थानावर आहे. क्रमवारीतील अंतर दोन संघांमधील फरक सांगून जातो. कर्णधार फाफ ड्युप्लेसी, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरुन ग्रीन, रजत पाटीदार हे स्टार खेळाडू बंगळूरच्या संघात आहेत. पण यापैकी एकालाही मोठी खेळी करता आलेली नाही.

सामन्याला कलाटणी देणारी क्षमता या खेळाडूंमध्ये नक्कीच आहे. मात्र आतापर्यंत त्यांच्याकडून अशी कामगिरी झालेली नाही. विराट कोहली याला अपवाद ठरत आहे. त्याने दोन अर्धशतकांसह २०३ धावा फटकावल्या आहेत. विराट याच्या एकट्याच्या जीवावर बंगळूरला जिंकता येणार नाही हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे फलंदाजांनी सांघिक कामगिरीत यश मिळवायला हवे.

IPL 2024 RCB VS RR
SRH vs CSK IPL 2024 : माक्ररमचे अर्धशतक तर अभिषेकचा तडाखा; हैदराबादचा चेन्नईवर सहज विजय

सॅमसन, पराग यांची चमक

राजस्थानच्या संघाने आतापर्यंत चमकदार खेळ केला खरा, पण कर्णधार संजू सॅमसन (१०९ धावा) व रियान पराग (१८१ धावा) या दोन फलंदाजांव्यतिरिक्त त्यांच्या संघातील फलंदाजांना मोठी खेळी करता आलेली नाही. यशस्वी जयस्वाल व जॉस बटलर या सलामीवीरांकडून निराशा झालेली आहे. दोघांनीही दमदार कामगिरी केल्यास राजस्थान संघाला याचा फायदा होऊ शकतो.

गोलंदाजीत फरक

राजस्थान व बंगळूरु या दोन संघांच्या गोलंदाजी विभागात कमालीचा फरक दिसून येतो. ट्रेंट बोल्ट, नांद्रे बर्गर व युझवेंद्र चहल या राजस्थानच्या तीन गोलंदाजांनी मिळून १६ फलंदाज बाद केले आहेत. राजस्थानच्या विजयाचे हे वैशिष्ट्य आहे. रवीचंद्रन अश्‍विन याला अद्याप सूर गवसलेला नाही. त्याला तीन सामन्यांमधून फक्त एकच फलंदाज बाद करता आला आहे. तसेच ८.३ च्या सरासरीने त्याच्या गोलंदाजीवर धावा देण्यात आल्या आहेत.

अश्‍विनकडे अनुभव प्रचंड आहे. त्यामुळे त्याच्याकडून झोकात पुनरागमन होऊ शकते. बंगळूरुच्या गोलंदाजांकडून सुमार कामगिरी होत आहे. मोहम्मद सिराज, अल्जारी जोसेफे, रीस टॉप्ली यांना अपयश आले. यश दयाल व ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी चार फलंदाज बाद केले आहेत, पण याचा प्रभाव संघाला विजय मिळवून देऊ शकलेला नाही.

इतिहास बंगळूरुच्या बाजूने, तर फॉर्म राजस्थानच्या

राजस्थान-बंगळूरु यांच्यामध्ये आतापर्यंत ३० लढती झालेल्या आहेत. बंगळूरु संघाने १५ लढतींमध्ये विजय मिळवला असून राजस्थानने १२ लढतींमध्ये विजय संपादन केलेला आहे. तीन लढतींचा निकाल लागलेला नाही. लढतींच्या निकषावर नजर टाकता कागदावर तरी बंगळूरुचे पारडे जड समजले जात आहे, पण यंदाच्या स्पर्धेतील फॉर्मनुसार राजस्थानचा संघ भारी आहे असेच म्हणावे लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com