Ruturaj Gaikwad CSK Captain : मला फार काही करायचं नाहीये... ऋतुराजची कर्णधार होताच पहिली प्रतिक्रिया

Ruturaj Gaikwad
Ruturaj Gaikwadesakal

Ruturaj Gaikwad CSK Captain First Reaction : महेंद्रसिंह धोनीने आयपीएल 2024 च्या पूर्वसंध्येला कर्णधारपद सोडत सीएसकेची धुरा युवा ऋतुराजच्या खांद्यावर ठेवली. सीएसकेच्या पुढच्या कर्णधारांमध्ये ऋतुराजचं नाव आघाडीवर होतं. मात्र अनपेक्षितपणे हंगामाच्या सुरूवातीलाच त्याचं नाव जाहीर होण्याने सर्वांना धक्का बसला.

सीएसकेचा कर्णधार झाल्यावर ऋतुराजने सीएसकेच्या सोशल मीडियावरून आपली पहिली प्रतिक्रिया दिली. त्याने कर्णधारपद मिळाल्यावर आनंद व्यक्त केला. याचबरोबर ही मोठी जबाबादारी असल्याचंही तो म्हणाला.

Ruturaj Gaikwad
Paris Olympics 2024 : बंदी उठताच पॅरिस ऑलिम्पिक आयोजक का वाटणार 3 लाख काँडोम्स?

ऋतुराज गायकवाड सीएसकेच्या व्हिडिओत म्हणाला की, 'कर्णधार झाल्यानंतर भारी वाटलं. हा सन्मान देखील आहे. यापेक्षाही जास्त महत्वाचं ही मोठी जबाबदारी आहे. ज्या प्रकारचे आमचा संघ आहे त्यामुळे मी फार उत्साही आहे. प्रत्येकाला पुरेसा अनुभव आहे. त्यामुळे मला फार काही गोष्टी करायची नाहीये.'

'याचबरोबर माझ्या सोबत मला मार्गदर्शन करायला माही भाई आहे. जड्डू भाई आहे अज्जू भाई आहे. तोही एक महान कर्णधार आहे. त्यामुळे जास्त काही चिंता नाहीये. आम्ही सामना एन्जॉय करण्यावर भर देणार आहोत.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com