
Ruturaj Gaikwad Viral Video Raises Questions
चेन्नई सुपर किंग्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये पाच सामन्यांत फक्त एक विजय मिळवता आला आहे. पाचवेळच्या विजेत्या महेंद्रसिंग धोनीच्या खेळण्यावरूनही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. अशातच गुरुवाती एक बातमी धडकली. कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे आयपीएल २०२५ च्या पुढच्या सर्व सामन्यातून माघार घेणार आहे. त्यामुळे महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा CSK captain म्हणून दिसणार आहे. ही घोषणा झाली आणि काही वेळातच सोशल मीडियावर ऋतुराजचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे तो खरंच जखमी आहे की त्याच्या माघारी मागे धोनीला कॅप्टन बनवण्याचं कारण आहे, अशी कुजबूज सुरू झाली आहे.